spot_img

Anushka Sharma : 5 वर्षांची झाली अनुष्का आणि विराटची लेक वामिका,शेयर केली पोस्ट

spot_img

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) ही जोडी इंडस्ट्रीतील पॉवर कपल समजले जाते. देशातच नाही तर जगभरात त्यांचे अनेक चाहते आहेत. दोघेही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. नुकतीच अनुष्का शर्माची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. निमित्त आहे विराट आणि अनुष्काची लेक वामिका हिच्या वाढदिवसाचं. वामिका आता पाच वर्षांची झाली आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री अनुष्का शर्माने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

आपल्या मातृत्वाचा प्रवास आणि लेकीबद्दलच प्रेम व्यक्त करणारी ही हृदयस्पर्शी पोस्ट चहात्यांना प्रचंड आवडली आहे. रविवारी म्हणजेच 11 जानेवारी रोजी विराट आणि अनुष्का ने लेकीचा पाचवा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त अनुष्काची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. लेकीसाठी अनुष्काने instagram वर एक खास स्टोरी पोस्ट केली आहे. यात ती म्हणाली,” “तुला ओळखण्याआधीची माझी कुठलीही मी परत मागे वळून पाहूही शकत नाही..कारण तूच आहेस, माझ्या बाळा,ज्यामुळे मी आजची मी झाले आहे.” अशा अर्थाची ओळ लिहीत तिने एक पोस्ट केली आहे. मातृत्व तुम्हाला बदलून टाकतं असंही ती म्हणाली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ