spot_img

Anurag Dobhal Health Update : युट्यूबर अनुराग डोभालचा इन्स्टाग्राम लाईव्हदरम्यान अपघात;अपघातानंतर फुफ्फुसांना गंभीर इजा

spot_img

लोकप्रिय युट्यूबर आणि बिग बॉस फेम अनुराग डोभाल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम लाईव्हदरम्यान घडलेल्या अपघातानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या आठवडाभरापासून त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याची माहिती त्याच्या मॅनेजरने दिली आहे.

माहितीनुसार, गेल्या रविवारी अनुरागने चालत्या कारमधून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. त्या वेळी तो सोशल मीडियावर लाईव्ह होता. अपघात घडल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आणि तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अनुरागचा मॅनेजर रोहित पांडेने सोशल मीडियावर त्याच्या प्रकृतीबाबत माहिती देताना सांगितले की, सुरुवातीला त्याची प्रकृती स्थिर होती; मात्र नंतर स्थिती बिघडली. अपघातात त्याच्या फुफ्फुसांना मोठी इजा झाली असून त्यामुळे गंभीर संसर्ग झाला आहे. डॉक्टरांनी त्याला तीव्र निमोनियाचे निदान केले असून सध्या तो डॉक्टरांच्या सततच्या देखरेखीखाली उपचार घेत आहे. चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करावी, असे आवाहनही त्याने केले.

दरम्यान, गुरुवारी अनुरागला आयसीयूमधून बाहेर काढण्यात आले आहे. त्याचा मॅनेजर रोहितने रुग्णालयातील बेडवर असलेला त्याचा फोटो शेअर करत सांगितले की, अनुराग आता आयसीयूच्या बाहेर आहे आणि त्याच्या टीमकडून २४ तास त्याची काळजी घेतली जात आहे.

अनुरागने यापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपल्या वैयक्तिक आयुष्यातील तणावाबद्दल बोलले होते. त्याने कुटुंबीयांवर गंभीर आरोप करत सांगितले की त्याच्या आंतरजातीय विवाहाला विरोध करण्यात आला होता आणि लग्नानंतर त्याला मानसिक त्रास सहन करावा लागला. जर त्याच्याबाबत काही अनर्थ घडला तर त्यासाठी कुटुंबीय जबाबदार असतील, असेही त्याने त्या व्हिडीओत म्हटले होते.

सध्या त्याच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून सोशल मीडियावर त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ