बिग बॉस मराठी 6 ची स्पर्धक कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकतंच अंकिताची पहिली संक्रात पार पडली. या संक्रातीच्या सोहळ्यात अंकिता लवकरच गुड न्यूज देणार आहे असं दिसलं. अंकिताचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. दरम्यान अंकिताची एक नवी पोस्ट समोर आली आहे. गुड न्यूजच्या चर्चांदरम्यान अंकिताच्या घरी एका नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे. अंकिताने फोटो शेअर करत आनंदाची चाहत्यांना दिली आहे. आज आमच्या आयुष्यात एक नवीन पाऊल पडलं, असं म्हणत अंकिता आणि तिचा नवरा कुणाल यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.
अंकिताने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, “आज आमच्या आयुष्यात एक नवीन पाऊल पडलं. दुसरी कार घेतली. या दोन्ही कार म्हणजे आमच्या मेहनतीचं आणि प्रगतीचं प्रतीक आहेत. माझ्या आणि कुणालच्या बिझनेस ग्रोथमध्ये या आमच्या लक्ष्मी म्हणून कायम सोबत राहतील. कृतज्ञता, मेहनत आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा प्रवास अजून पुढे जाऊ दे.” अंकिता आणि कुणाल यांनी सुझूकी कंपनीची कार खरेदी केली आहे. दोघांच्या घरी आलेल्या नव्या पाहुणीचं चाहत्यांनी देखील स्वागत केलं आहे. अनेक कलाकार आणि चाहत्यांनी अंकिताचं अभिनंदन केलं असून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अंकिताने तिच्या लग्नाच्या काही दिवस आधीच नवीकोरी ऑडी कार खरेदी केली होती. ती कार तिने लग्नासाठी गावी नेली आणि समारंभाहून परत येत असताना त्या कारचा अपघात झाला होता. कारचा आरसा आणि काही भाग डॅमेज झाला होता. अंकिताने व्हिडीओ शेअर करत संपूर्ण घटना शेअर केली होती. लग्नाच्या काही वर्षात अंकिता आणि कुणाल यांनी पुन्हा एकदा नवी कार खरेदी केली आहे.




