Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणात अंजली दमानियांचा मोठ्या व्यक्तींवर संशय

spot_img

स्वतःला बाबा म्हणवणाऱ्या अशोक खरात प्रकरणात दररोज नवीन धक्कादायक माहिती समोर येत असून राज्यभरात खळबळ उडाली आहे. 18 मार्च रोजी अटक झाल्यानंतर सुरू असलेल्या एसआयटी चौकशीत अनेक गंभीर आरोप उघड झाले आहेत.

माहितीनुसार, श्रद्धेचा गैरफायदा घेत खरातने अनेक महिलांना फसवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. महिलांना कार्यालयात बोलावून दीर्घकाळ त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या घटनांचे काही व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाल्याचीही माहिती तपासात समोर आली आहे.

चौकशीदरम्यान खरातने “माझा शेवट इथेच होणार,” अशा स्वरूपाचे विधान केल्याचेही समजते. या वक्तव्यामुळे त्याच्या सुरक्षेबाबत नवे प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात गंभीर आरोप करत, “शिजुका नॉडी” या नावाने अनेक फोन कॉल्स झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी या प्रकरणामागे प्रभावशाली व्यक्तींचा हात असू शकतो, अशी शंका व्यक्त केली.

तसेच रुपाली चाकणकर यांचे खरातशी 177 वेळा संभाषण झाल्याचा दावा पुन्हा करत, त्यांना अद्याप चौकशीसाठी समन्स का पाठवले गेले नाहीत, असा सवालही दमानिया यांनी उपस्थित केला आहे.

या प्रकरणामुळे राज्यात मोठी चर्चा सुरू असून पुढील तपासात आणखी कोणते खुलासे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ