spot_img

Anil agarwal : श्रीमंत उद्योजकाच्या मुलाचं निधन,कोटींचा मालकी हक्क कोणाकडे जाणार?

spot_img

देशाचे दिग्गज उद्योजकांच्या यादीतील अव्वल वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल (Anil Aggarwal) यांच्यवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 2026 वर्षाच्या सुरुवातील त्यांनी एकुलत्या एका मुलाला गमावलं आहे. अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांनी वयाच्या 49 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. ज्यामुळे संपूर्ण अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलाच्या निधनानंतर आता संपत्तीचं काय होणार अशा प्रश्न देखील अनेकांनी उपस्थित केला आहे. आता त्यांचा मुलगा हयात नाही, तर त्यांचा व्यवसाय पुढे नेण्याची मोठी जबाबदारी कोण घेईल? याबद्दल माहिती समोर आली आहे.

अनिल अग्रवाल यांची मुलगी प्रिया अग्रवाल सध्या Vedanta आणि Hindustan Zinc च्या बोर्डमध्या समिल आहे. हिंदुस्तान झिंक कंपनीच्या अध्यक्षा म्हणून त्या जबाबदारी सांभाळत आहे. व्यवसायात त्यांची मजबूत पकड असल्याची देखील माहिती समोर येत आहे आणि येणाऱ्या काळात वेदांताची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर राहण्याची अपेक्षा आहे. अशात मुलाच्या निधनानंतर अग्रवाल भावनिक झाले आणि म्हणाले की आता ते अधिक साधे जीवन जगतील आणि अग्निवेशची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी समाजसेवेचं काम अधिक वेगाने पुढे नेतील. अग्निवेश यांचे स्वप्न होतं की, देशातील एकाही मुलाला उपाशी झोपू देणार आणि प्रत्येक तरुणाला काम मिळावं, या संकल्पाने अग्रवाल कुटुंब आता पुढे जाणार आहे… असं देखील अनिल अग्रवाल म्हणाले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ