spot_img

Anganewadi Jatra 2026 : रेल्वेची मोठी घोषणा! आंगणेवाडी यात्रेसाठी कोकणात धावणार जादा गाड्या

spot_img

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील प्रसिद्ध आंगणेवाडी यात्रेसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांचा वाढता ओघ लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेगाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद, तसेच तिकीट आरक्षणावर आलेला ताण पाहता यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या विशेष गाड्यांना अतिरिक्त फेऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

नव्या वेळापत्रकानुसार गाडी क्रमांक 01004 मडगाव जंक्शन–लोकमान्य टिळक टर्मिनस (Lokmanya Tilak Terminus) विशेष रेल्वे दि. 11 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4.30 वाजता मडगाव जंक्शन येथून सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 5.50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 01003 लोकमान्य टिळक टर्मिनस–मडगाव जंक्शन विशेष रेल्वे दि. 12 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.55 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10.00 वाजता मडगाव जंक्शन येथे दाखल होईल.

या विशेष रेल्वेगाड्यांना करमळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे या प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे आंगणेवाडी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ