spot_img

Anganewadi Jatra 2026 : कोकणातील आंगणेवाडीच्या प्रसिद्ध यात्रेला ‘या’ तारखेपासून सुरूवात होणार !

spot_img

भराडी देवीचा ‘कौल’ मिळाला.

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण (Malvan) तालुक्यातील मसुरे येथील श्री देवी भराडी यात्रेची तारीख अखेर निश्चित झाली आहे. श्री देवी भराडी देवीचे मानकरी असलेल्या आंगणे कुटुंबियांनी ही तारीख जाहीर केली आहे. आंगणे कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 9 फेब्रुवारी 2026 रोजी भराडी देवीचा हा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. यात्रेची तारीख जाहीर होताच, केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच नव्हे, तर महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातून येणाऱ्या लाखो भाविकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक या यात्रेसाठी मसुरे येथे दाखल होत असतात. कोकणच्या संस्कृतीचे प्रतीक असलेल्या या यात्रेसाठी आतापासूनच तयारीला सुरुवात झाली आहे.

भाविकांच्या सोयीसाठी प्रशासकीय पातळीवरही मोठ्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक देशभरातून येत असल्याने त्यांच्या प्रवासाची व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई (Anganewadi Jatra) आणि पुणे येथून जास्त एसटी गाड्या सोडल्या जाणार आहेत, तसेच कोकण रेल्वे मार्गावरही जादा रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन केले जात आहे. एका दिवसाच्या या यात्रोत्सवात प्रचंड गर्दी होते, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. यासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन सुरू आहे. देवीचे मानकरी असलेले आंगणे कुटुंबीय आणि ग्रामस्थ मंडळ हे भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी महिनाभर आधीपासूनच तयारीला लागतात. 9 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या या यात्रोत्सवासाठी दर्शन, निवास आणि सुरक्षा या दृष्टीने मोठी व्यवस्था उभारण्याचे काम आतापासूनच सुरू झाले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ