spot_img

Anant Dhumma : तिकीट न मिळाल्यास टोकाचे पाऊल उचलण्याची भाजप कार्यकर्त्याची धमकी

spot_img

मनपा निवडणुकीपूर्वी भाजप कार्यकर्त्याची धमकी.

आगामी सोलापूर महानगरपालिकेत निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून भाजपमध्ये अंतर्गत बंडाळी उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या 40 वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते अनंत धुम्मा यांनी उमेदवारीसाठी थेट पक्षनेत्यांनाच इशारा दिला आहे. त्यामुळे सोलापुरात मोठी खळबळ उडाली आहे. मला उमेदवारी मिळायलाच हवी, अन्यथा माझ्या जीवाचे बरे-वाईट झाल्यास त्याला पक्ष जबाबदार असेल,” असे खळबळजनक विधान अनंत धुम्मा (Anant Dhumma) यांनी केले आहे.

सोलापूर महानगरपालिकेच्या (Solapur Municipal Corporation)102 जागांसाठी भाजपकडून इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. तब्बल 1200 हून अधिक कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जाण्याची भीती व्यक्त होत आहे. अनंत धुम्मा हे गेल्या चार दशकांपासून भाजपचे काम करत आहेत. यावेळी सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी संधी मिळावी यासाठी ते आग्रही आहेत. त्यांचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा इशारा दिल्याचे दिसून येत आहे. ‘”मी गेल्या 40 वर्षांपासून भाजपचे काम करत आहे. पक्ष स्थापन झाल्यापासून मी काम करतोय. भाजप पक्षावर विश्वास ठेवून मी पक्षाचे काम करत आहे. मला यावेळी 100 टक्के न्याय मिळेल, असे मला वाटत आहे. तसेच मी भाजपला सांगू इच्छितो की माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यासोबत जर तुम्ही चुकीचं करत असाल आणि माझ्या जीवाचं बरं-वाईट काही झालं तर त्याला मी जबाबदार नाही “असे अनंत धुम्मा म्हणाले.

“मी इतके वर्ष काम करत आहे. मी नगरसेवक नसतानाही एक कार्यकर्ता म्हणून आज केंद्राच्या योजना, राज्य सरकारच्या योजना घराघरात पोहोचवल्या आहेत. मी इतकं सर्व काम करुन जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर स्वत:ला काहीतरी करुन घेण्याशिवाय पर्याय नाही. जे निष्ठावंत आहेत, जे काम करतात त्यांना 100 टक्के न्याय देण्याचा प्रयत्न करा, असेही अनंत धुम्मा यांनी यावेळी सांगितले”. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी आपण हे विधान भावनेच्या भरात केल्याचे स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ