spot_img

Amruta Deshmukh : पुण्याच्या नाट्यगृहातील वाईट सुविधांवर अभिनेत्रीने ओढले ताशेरे,व्हिडीओ केला शेयर

spot_img

आजही अनेक नामांकित नाट्यगृहांची परिस्थित जैसे थे आहे. याचा पुरावा प्रसिद्ध अभिनेत्री अमृता देशमुख (Amruta Deshmukh) हिनं दिला आहे. पुण्याचा नामांकित बालगंधर्व नाट्यगृहाच्या आतील सोयी सुविधांवर अमृतानं चांगलेच ताशेरे ओढलेत. अमृता व्हिडीओ शेअर करत तिथल्या यंत्रणेला प्रश्न विचारलेत. अमृतानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती म्हणतेय, “पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आमचा ‘नियम व अटी लागू’ नाटकाचा प्रयोग आहे. गेली कित्येत प्रयोग मी हे अनुभवतेय आणि मला खात्री आहे की खूपजण हे अनुभवत असणार. पुण्यातील असे कित्येक थिएटर आहेत जे अतिशय छान मेन्टेन केले आहेत. बालगंधर्व रंगमंदिराची नेहमीची रड आहे. इतके घाणेरडे वॉशरूम्स असतात. बॅकस्टेजला एन्ट्री केली सगळीकडे वास यायला लागतात. VIP रूम्स सजावट करून तिथे जो पैसे ओतला जातो त्यापेक्षा इथल्या वॉशरूमची मॅनेजमेन्ट सुधरावी अशी एक माफक अपेक्षा आहे. रूममधले अटॅच वॉशरूम, बाथरूम्स आहेत त्याची इतकी बिकट अवस्था आहे की, इथले सफाई कर्मचारी जे आहेत ते प्रयोग सुरू होण्याच्या पाच मिनिटं आधी आले आहेत.”

अमृताने सफाई कर्मचाऱ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते अमृताशीच हुज्जत घालताना दिसले. अमृता पुढे म्हणाली, “सफाई कर्मचारी पाट्या टाकून गेले. इतकं जुनं रंगमंदिर आहे जिथे सतत प्रयोग होत असतात, सतत मोठी लोक येत असतात, कित्येक लोक परफॉर्म करत असतात, पॉलिटिकल कार्यक्रम असतात तरीही इथे इतकी दयनीय अवस्था कायम बालगंधर्व रंगमंदिराची असते. याला जबाबदार कोण हे त्या त्या मॅनेजमेन्टने बघितलं पाहिजे.”

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ