spot_img

Amitabh Bachchan Sells Two Luxury Apartments : बिग बींनी विकले मुंबईतील दोन आलीशान घरं !

spot_img

अमिताभ बच्चन यांनी कमावला कोट्यवधींचा नफा

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हणून ओळखलं जात असली तरी, त्यांची गणना देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांमध्येही केली जाते. बिग बींचा प्रॉपर्टी पोर्टफोलियो याचा पुरावा आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांच्याकडे मुंबईतील जुहू परिसरात पाच आलिशान बंगले आहेत. जलसा, प्रतीक्षा, जनक, वत्स आणि जलसाच्या पाठीमागेच आणखी एक प्रॉपर्टी आहे. जलसामध्ये बिग बी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत राहतात. त्यापूर्वी ते प्रतीक्षामध्ये राहायचे. तर, जनक बंगला त्यांचं फॅमिसी ऑफिस म्हणून वापरला जायचा. तर, वत्स त्यांनी कमर्शियल यूजसाठी भाड्यानं दिला आहे. मुंबईतील गोरेगाव (Goregaon) परिसरातील दोन आलिशान मालमत्ता विकल्या आहेत. या मालमत्ता विकून बिग बींनी रातोरात कोट्यवधींचा नफा कमावला आहे.

अमिताभ बच्चन यांनी विकलेले दोन्ही फ्लॅट्स गोरेगाव (पूर्व) येथील ‘ओबेरॉय एक्सक्विझिट’ इमारतीच्या ४७व्या मजल्यावर आहेत. नोंदीनुसार, पहिला फ्लॅट (1,820 चौ. फूट) आशा ईश्वर शुक्ला यांना 6 कोटी रुपयांना विकण्यात आला. या व्यवहारात 30 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि 30,000 रुपयांची नोंदणी फी समाविष्ट होती. 31 ऑक्टोबर 2025 रोजी त्याची अधिकृत नोंदणी झाली. दुसरा फ्लॅटही तितक्याच आकाराचा असून (1,820 चौ. फूट), तो ममता सुरजदेव शुक्ला यांना 6 कोटींना विकण्यात आला आहे. या व्यवहारासाठीही समान मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी आकारण्यात आली. दुसऱ्या फ्लॅटची नोंदणी 1 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आली. नोंदणी कागदपत्रांनुसार, या दोन फ्लॅट्ससाठी एकूण चार कार पार्किंगची सोय उपलब्ध आहे.

रिअल इस्टेट अॅनालिटिक्स प्लॅटफॉर्म CRE Matrix च्या कागदपत्रांनुसार, अमिताभ बच्चन यांनी हे दोन्ही फ्लॅट वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या खरेदीदारांना विकलेत. गमतीशीर बाब म्हणजे, दोन्ही खरेदीदारांना प्रत्येकी एका कारसाठी पार्किंगची जागा देखील मिळाली. हे अपार्टमेंट गोरेगावच्या पश्चिम उपनगरातील एका प्रीमियम टॉवरमध्ये आहेत, ज्यावरून मुंबईचा शानदार व्यू पाहायला मिळतो.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ