spot_img

Amitabh Bachchan : बाळ जन्मलं की गावात आधी अमिताभ यांचा चित्रपट?

spot_img

‘केबीसी’च्या सेटवर जयदीपने शेअर केली गावची परंपरा; अमिताभ बच्चन ऐकून झाले भावूक

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या लोकप्रियतेबद्दल नवीन सांगायला नको, पण नुकताच असा एक किस्सा समोर आला आहे की ज्यामुळे स्वतः बिग बीही भावूक झाले.

अभिनेता जयदीप अहलावत ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati)च्या सेटवर आले असताना त्यांनी त्यांच्या गावातील एक खास परंपरा अमिताभ बच्चन यांच्यासमोर सांगितली. त्यांच्या गावात एखाद्या बाळाचा जन्म झाला की तो आनंद अमिताभ बच्चन यांचा चित्रपट पाहिल्याशिवाय पूर्णच होत नाही. गावकरी नवजात शिशूच्या आगमनाचा आनंद ‘जंजीर’, ‘डॉन’ (Don) यांसारखे चित्रपट लावून साजरा करतात.

जयदीप म्हणाले की, लहानपणापासून घरात किंवा गावात बाळ होताच अमिताभ यांचा चित्रपट चालू करणं हीच प्रथा होती. त्यामुळे त्यांनी अमिताभंचे अनेक चित्रपट शंभराहून अधिक वेळा पाहिले.

केवळ चित्रपटच नव्हे, तर ‘शोले’ची ऑडिओ कॅसेट तर गावाच्या सण–उत्सवांचा जणू अविभाज्य भाग होती. होळी असो की दिवाळी गावात सर्वजण जमून ती कॅसेट वारंवार ऐकत असत.

हा सगळा किस्सा जेव्हा जयदीपांनी केबीसीच्या मंचावर सांगितला, तेव्हा अमिताभ बच्चन स्वतःही भावूक झाले. त्यांनी गावकऱ्यांच्या या प्रेमभावनेचा मनापासून आदर व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ