America Israel War : अमेरिका–इस्त्रायल विरुद्ध इराण संघर्ष तीव्र; नव्या मिसाईल बेसमुळे तणाव वाढला

spot_img

अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष आता अधिकच तीव्र होत असून, या युद्धाला जवळपास एक महिना पूर्ण झाला आहे. या कालावधीत मोठ्या प्रमाणावर हल्ले आणि प्रत्युत्तरात्मक कारवाया झाल्या आहेत. अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराणचे अनेक वरिष्ठ कमांडर ठार झाल्याचे सांगितले जात असले, तरी इराणने माघार घेण्याची कोणतीही चिन्हे दाखवलेली नाहीत. उलट, इराणकडून अमेरिकन आणि इस्त्रायली तळांवर हल्ले सुरूच आहेत.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन वेळा युद्धविराम घडवून आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी ठरलेला नाही. त्यामुळे अमेरिका या संघर्षात अधिक गुंतल्याचे चित्र दिसत आहे.

आता समोर आलेल्या नव्या माहितीनुसार, इराणने आपल्या नवीन आणि अत्यंत सुरक्षित मिसाईल बेसचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. हे बेस जमिनीखाली खोलवर आणि डोंगराळ भागात असल्याचे सांगितले जात असून, ते शोधणे आणि नष्ट करणे अत्यंत कठीण मानले जात आहे.

अमेरिका आणि इस्त्रायलने इराणच्या काही क्षेपणास्त्र ठिकाणांवर हल्ले करून नुकसान केले असले, तरी आतापर्यंत फक्त सुमारे 25 टक्केच बेस उद्ध्वस्त करण्यात यश मिळाल्याचे म्हटले जात आहे. त्यातच इराणने धक्कादायक दावा करत सांगितले की, त्यांनी आतापर्यंत केवळ 30 टक्केच मिसाईल वापरले असून उर्वरित 70 टक्के साठा सुरक्षित आहे. तसेच, युद्ध दीर्घकाळ चालले तरी ते त्यासाठी तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर चिंता वाढली आहे. युद्ध सुरू होऊन अवघ्या महिनाभरातच इंधन टंचाईची समस्या निर्माण झाली असून, हा संघर्ष आणखी वाढल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ