spot_img

Ambernath Accident Case : अंबरनाथ उड्डाणपूलावर भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, दोघे जखमी

spot_img

भरधाव कारने दुचाकींना दिली धडक.

अंबरनाथ (Ambernath) उड्डाणपूलावर शुक्रवारी संध्याकाळी भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कारने समोरून येणाऱ्या दोन ते तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. कार उड्डाणपूलावरून पलटी झाली. या भीषण अपघातात कारमधील चालक तसेच दुचाकीवरील तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघातामुळे उड्डाणपूल आणि कल्याण बदलापूर मार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाली होती.

अंबरनाथ शहरात निवडणुकीची धामधूम सुरू असतांना शुक्रवारी संध्याकाळी उड्डाणपूलावरून पूर्व भागातून पश्चिमेकडे एक महिला उमेदवार आपल्या चालकासह पश्चिमेत सभेसाठी चालल्या होत्या. यावेळी त्यांच्या वाहन चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने त्याने समोरून येणाऱ्या तीन दुचाकींना जोरदार धडक देत कार पलटी झाली. या भीषण अपघात दुचाकीवरील एक चालक कारच्या धडकेत थेट उड्डाणपूलाच्या खाली फेकला गेला. त्यामुळे उड्डाणपूलावर एकच खळबळ उडाली. त्यानंतर इतर वाहन चालक आणि उड्डाणपूला खालील लोकवस्तीतील नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. या अपघातात कार चालक लक्ष्मण शिंदे यांच्यासह दुचाकी वरील दोघे पालिका कर्मचारी असलेले शैलेश जाधव आणि दुचाकी इतर दोघे अशा चार जणांचा मृत्यू झाला आहे. तिघे जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर या अपघातामुळे उड्डाणपूल आणि कल्याण, बदलापूर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस अधिक तपास करत होते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ