spot_img

Ambadas Danve : पार्थ पवार प्रकरणावर नवा स्फोट “भाजप पार्थला वाचवत आहे”, दानवे यांचा आरोप!

spot_img

अजित पवारांच्या राजीनाम्याची तयारी? वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीतील मोठा खुलासा; ठाकरे गटाने उपस्थित केला गंभीर प्रश्न पार्थवर अजून गुन्हा का नाही?

पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा मुलगा पार्थ पवार (Parth Pawar) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. “अमेडिया” या कंपनीमार्फत सुरू असलेल्या जमिनीच्या व्यवहारात पार्थचे नाव समोर आल्यानंतर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी हा व्यवहार रद्द केल्याचे सांगितले असले, तरी अद्याप पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्याने विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी याबाबत गंभीर आरोप करत म्हटले आहे की, “पार्थ पवारला भाजप वाचवत आहे.” त्यांनी सांगितले की, “भाजपच अडचणीत आणते आणि भाजपच बाहेर काढते, हेच या प्रकरणात दिसते. कंपनीचा डायरेक्टर असूनही पार्थवर गुन्हा दाखल का नाही? मुद्रांक शुल्क न भरता व्यवहार कसा रद्द झाला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दानवे पुढे म्हणाले की, “एका तहसीलदारावर जबाबदारी टाकून मोठ्या लोकांना वाचवले जात आहे. जिल्हाधिकारी बाजूला ठेवले जात आहेत. तहसीलदार एवढी हिंमत कोणाच्या आदेशाशिवाय करू शकत नाही. त्यामुळे पार्थ पवारवर गुन्हा दाखल व्हायलाच हवा.”

याच संदर्भात दानवे यांनी एक मोठा दावा केला. “वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत अजित पवारांनी संतापून ‘मी राजीनामा देतो, सरकारला बाहेरून पाठिंबा देतो’ अशी भूमिका घेतली होती,” असे ते म्हणाले.

दानवे यांनी भाजपवर टीका करताना सांगितले की, “पार्थ पवार काही लहान बाळ नाही. लोकसभा लढवलेला व्यक्ती नागरिक म्हणून जबाबदार आहे. कुणाचा मुलगा म्हणून सवलत देऊ नये.” त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पार्थ पवार प्रकरणाच्या चौकशीचा पुढचा टप्पा काय असेल, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ