Alka Yagnik : हियरिंग डिसऑर्डरशी अलका याज्ञिक यांची झुंज; भावूक पोस्ट केली शेयर

spot_img

आपल्या सुरेल आवाजाने लाखो चाहत्यांची मने जिंकणाऱ्या अलका याज्ञिक सध्या गंभीर आरोग्य समस्येशी सामना करत आहेत. त्यांनी नुकतेच सांगितले की, त्या अजूनही ‘हियरिंग डिसऑर्डर’ या दुर्मिळ आजाराने त्रस्त असून याचा त्यांच्या कामावर मोठा परिणाम झाला आहे.

एका मुलाखतीत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, या आजारामुळे त्यांना सध्या गाण्यांच्या नवीन संधी स्वीकारता येत नाहीत. ‘सेंसरी न्यूरल नर्व हियरिंग लॉस’ या आजारामुळे श्रवणशक्तीवर परिणाम झाला असून, हा त्रास व्हायरल इन्फेक्शननंतर सुरू झाल्याचे त्यांनी यापूर्वी सांगितले होते.

दरम्यान, त्यांना नुकताच भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान पद्मभूषण जाहीर झाला. या सन्मानाबद्दल त्यांनी आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या मुलीकडून ही आनंदाची बातमी मिळाल्याचे सांगत, सरकारचे आभार मानले.

अचानक या आजाराची माहिती मिळाल्याने त्यांना मोठा धक्का बसला होता. त्यांनी चाहत्यांना आपल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही केले होते. त्यानंतरपासून त्यांनी कोणतेही नवीन प्रोजेक्ट स्वीकारलेले नाहीत. संगीतकारांकडून ऑफर्स येत असल्या तरी सध्या रेकॉर्डिंग करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या परिस्थितीतही चाहत्यांकडून त्यांना मोठा पाठिंबा मिळत असून, त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ