Akshay Kumar : मरणाच्या दारात होती लारा दत्ता, अक्षय कुमारने लावली जिवाची बाजी! ‘अंदाज’च्या सेटवरील तो थरार पहिल्यांदाच समोर

spot_img

समुद्राच्या लाटांनी ओढले खाली; पोहता येत नसल्याने गुदमरला होता श्वास, ‘खिलाडी’ने वाचवले प्राण

बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत पडद्यावर दिसणारे दृश्य जितके सुंदर असते, तितकेच ते चित्रित करताना अनेकदा कलाकारांच्या जिवावर बेतते. असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा अनुभव अभिनेत्री लारा दत्ता हिने नुकताच शेअर केला आहे. ‘अंदाज’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान लारा दत्ता समुद्रात बुडत असताना अक्षय कुमारने देवदूतासारखे धावून येत तिचे प्राण वाचवले होते. एशियन टेलिव्हिजन नेटवर्कशी बोलताना लाराने सांगितले की, एका डान्स सीनच्या चित्रीकरणावेळी ती लेदरचे कपडे घालून पाण्यात उतरली होती. पोहता येत नसल्याने आणि कपड्यांच्या वजनामुळे ती एखाद्या दगडासारखी समुद्राच्या तळाला जाऊ लागली. त्याच वेळी अक्षय कुमारने प्रसंगावधान राखत तिला घट्ट पकडले आणि ओढत किनाऱ्यावर आणले, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

या भीषण अपघातानंतर लाराला ‘हायपोथर्मिक शॉक’ बसला होता, ज्यामुळे शूटिंग तातडीने थांबवून तिला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. या घटनेचा लाराच्या मनावर इतका खोल परिणाम झाला की, त्यानंतर तिने समुद्रातील सीन असलेले चित्रपट नाकारायला सुरुवात केली. एवढेच नाही तर अक्षय कुमारने तिला जेव्हा ‘ब्लू’ चित्रपटासाठी पोहणे शिकण्याचा सल्ला दिला, तेव्हाही भीतीपोटी तिने नकार दिला होता. “वयाच्या ३० व्या वर्षी आता पोहणे कसे शिकू?” असे ती अक्षयला म्हणायची. मात्र, त्या दिवशी जर अक्षय तिथे नसता, तर आज परिस्थिती वेगळी असती, अशी कृतज्ञता व्यक्त करताना लारा दत्ता भावूक झाली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ