spot_img

Akshay Kumar : ‘व्हील ऑफ फॉर्च्युन’ शोमधून अक्षय कुमार येणार प्रेक्षकांच्या भेटीला !

spot_img

 टेलिव्हिजनवरही खिलाडी कुमारची जादू;

बॉलिवूड सुपरस्टार्सनी टीव्ही रिअॅलिटी शो होस्ट करणं आता नवीन राहिलेलं नाही. सलमान खान, शाहरुख खान, अमिताभ बच्चन, आमिर खान आणि करण जोहर यांच्यानंतर आता या यादीत अक्षय कुमारचंही नाव सामील झालं आहे. लवकरच अक्षय कुमार एका मोठ्या रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. ‘खिलाडी’ म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार (Akshay Kumar) आपल्या दमदार अभिनयाने आणि वेगवेगळ्या भूमिकांमुळे जगभरात लोकप्रिय आहे. आता तो तब्बल 60 देशांमध्ये लोकप्रिय असलेल्या रिअॅलिटी शोचा होस्ट होणार आहे. या घोषणेनंतर अक्षयच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय.

‘व्हील ऑफ फॉर्च्युन’ हा एक जुना आणि लोकप्रिय गेम शो असून तो 1975 पासून प्रसारित होत आहे. आता हा शो भारतीय टेलिव्हिजनवर नव्या स्वरूपात सादर केला जाणार आहे.या शोमध्ये अक्षय कुमार स्पर्धकांना प्रश्न विचारतील. त्यानंतर एक मोठं व्हील फिरवलं जाईल आणि जिथे व्हील थांबेल, त्या रकमेवर स्पर्धकांची जिंक निश्चित होईल.60 देशांमध्ये लोकप्रिय असलेल्या या शोमध्ये स्पर्धकांना वेगवेगळ्या कॅटेगरीमधून प्रश्न निवडण्याची संधी मिळते. प्रश्नाशी संबंधित एक पझल स्क्रीनवर दाखवला जातो आणि तो पझल सोडवून स्पर्धकांना बक्षिसाची रक्कम जिंकता येते. अक्षय कुमारचा ‘व्हील ऑफ फॉर्च्युन’ही याच फॉरमॅटवर आधारित असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ आणि ‘व्हील ऑफ फॉर्च्युन’ (Wheel of Fortune) या दोन्ही शोमध्ये मोठा फरक आहे. ‘केबीसी’ हा पूर्णपणे जनरल नॉलेजवर आधारित आहे, तर ‘व्हील ऑफ फॉर्च्युन’मध्ये पझलसोबतच नशिबालाही तितकंच महत्त्व दिलं जातं.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ