महाराष्ट्रात सध्या राजकारणाचा पारा चढला असून निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. प्रत्येक गल्लीत, चौकात फक्त आणि फक्त प्रचाराच्याच चर्चा ऐकायला मिळत आहेत. पण यंदाचा प्रचार फक्त राजकीय नेत्यांच्या भाषणांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्यात आता बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीचा ग्लॅमरस तडका लागला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी आता चक्क पडद्यावरचे लाडके कलाकार रस्त्यावर उतरले असून, त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
मुंबईत रवीनाची चर्चा असतानाच तिकडे लातूरमध्येही निवडणुकीचं वातावरण तापलं आहे. मराठी चित्रपटातील हँडसम हंक आणि तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेला सैराट फेम आकाश ठोसर (Akash Thosar) आपल्या आवडत्या उमेदवारासाठी थेट मैदानात उतरला आहे. लातूर (Latur) मधील प्रभाग 1 चे काँग्रेस उमेदवार गोपाळ बुरबुरे यांच्या प्रचारासाठी आकाशने हजेरी लावली होती.आपल्या लाडक्या ‘परश्या’ला पाहण्यासाठी लातूरकरांनी मोठी गर्दी केली होती. आकाशने उमेदवाराच्या खांद्याला खांदा लावून पदयात्रेत सहभाग घेतला. त्याचे हे फोटो आणि व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. निवडणूक जवळ आली की कलाकार प्रचारात दिसणं नवीन नाही, पण यंदा ज्या पद्धतीने हे स्टार्स लोकांमध्ये मिसळून प्रचार करत आहेत, ते पाहता चुरस वाढली आहे.




