spot_img

Ajit Pawar Plane Crash : जय पवार यांनी वडिलांच्या आठवणीत शेअर केली भावुक पोस्ट

spot_img

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनाला आज सात दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, सात दिवस उलटूनही दादा आता आपल्यात नाहीत, या सत्यावर अद्याप कोणाचाही विश्वास बसत नाहीये. अजित पवार यांच्या अचानक जाण्याने केवळ पवार कुटुंबच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. दरम्यान, त्यांचे सुपुत्र जय पवार यांनी सोशल मीडियावर आपल्या वडिलांच्या आठवणीत एक अत्यंत भावुक पोस्ट (Post) शेअर केली आहे.

जय पवार (Jai Pawar) यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अजित पवारांसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये जय यांनी आपल्या मनातील वेदना मोकळ्या केल्या आहेत. पहिला फोटो अजित पवार आणि जय पवार यांचा आहे. ते एका तलावाच्या बाजुला निसर्गरम्य ठिकाणी हाताची घडी घालून उभे आहेत. या फोटोवर जयने ‘तुमची खूप आठवण येतेय, डॅड’ असं कॅप्शन लिहिलं आहे. तर दुसऱ्या फोटोत जयने अजित पवारांना मिठी मारल्याचा फोटो शेअर केला आहेत. यात त्यानं लिहिलं की, “डॅड, काश वेळ थांबली असती… मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो.” या शब्दांतून वडिलांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आणि मुलाचे वडिलांप्रति असलेले अतोनात प्रेम दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ