नमो शेतकरी सन्मान निधी योजना (Namo Shetkari Sanmman Yojana) ही केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने सुरू केली आहे. पीएम किसान योजनेअंतर्गतही शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे २१ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून, २२वा हप्ता लवकरच वितरित केला जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा हप्ता देखील पुढील महिन्यात शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील जमा करण्यात येणार असल्याने, शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ४ हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे.
राज्यात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे सुमारे ९० ते ९४ लाख लाभार्थी शेतकरी आहेत. या सर्व पात्र शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारण आठ दिवसांच्या आत राज्य सरकार नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करणार आहे.




