spot_img

Affordable bridal wear : काय सुरतच्या या मार्केटमध्ये मिळतात अगदी बजेट फ्रेंडली लेहंगे ?

spot_img

दिवाळी झाली आता तुलशीच्या लग्नानंतर लग्न सराईचा माहोल सुरु होईल आणि लग्नासाठी लोक आटा भरपूर खरेदी करतील. लग्नात नवरी म्हणून चांगलं दिसलच पाहिजे असा प्रत्येक मुलीचा हट्ट आणि इच्छा असते त्यामुळे तो दिवस सुंदर बनवण्यासाठी कपडे महत्वाचे आहेत… जर तुम्हाला लग्नाची शॉपिंग करायची असेल तर, भारतातील हे मार्केट बेस्ट ठिकाण आहे. मुंबई, दिल्ली ,लखनौ अशी बरीच ठिकाणे आहेत जिथे आपण लग्नाची खरेदी करू शकतो. लागाच्या खरेदी वधु पासून तिचा पूर्ण परिवार खरेदीत सामील असतो. बहुतेक वधूच्या बहिणी लेहेंगा घालणे पसंत करतात, जे शाही आणि श्रीमंत लूक देण्यासाठी योग्य मानले जातात आणि त्याने एक ग्लॅमर्स लुक देखील तयार होतो.

सांगायचं झालं तर, दिल्लीतील चांदणी चौक बाजारपेठ हे बजेटमध्ये लेहेंगे खरेदी करण्यासाठी अगदी योग्य ठिकाण मानले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की चांदणी चौकापेक्षा सुरतमध्ये सर्वात स्वस्त लेहेंगे मिळतात. लेहेंगा फक्त 2 ते 3 वेळा घातला जातो… त्यामुळे महिलांना कमी किंमती असलेले लेहेंगे हवे असतात कारण पैशानेपण हे लेहेंगे महाग असतात. जर तुम्ही 5 हजार रुपयांच्या बजेटमध्ये लेहेंगा खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सुरतला आवश्य खरेदी करा.

बॉम्बे मार्केट: सुरतचे बॉम्बे मार्केट हे अगदी बजेट-फ्रेंडली लेहेंग्यांसाठी ओळखले जाते. हे एक कापड केंद्र आहे जिथे पारंपारिक चनिया चोळी, लेहेंगा आणि साड्यांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. हे मार्केट सोमवार ते शनिवार सुरु असून ते रविवारी बंद असते. मार्केटमध्ये दुकाने सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुली असतात. तुम्ही लेहेंग्यापासून साड्यांपर्यंत सर्व काही परवडणाऱ्या किमतीत येथे खरेदी करू शकता. तर हि काही ठिकाणे आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ