spot_img

Actress Tejaswini Lonari Statement : साखरपुड्यानंतर अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचं जुनं वक्तव्य व्हायरल !

spot_img

“50 जणांनी प्रपोज केलं,पण लग्नासाठी एकही स्थळ नाही”

मराठी मनोरंजन विश्वातील देखणी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचा (Actress Tejaswini Lonari) नुकताच साखरपुडा पार पडला आहे.अभिनेत्रीचा साखरपुडा शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार सदा सरवणकर यांचा थोरला मुलगा समाधान सरवणकर यांच्यासोबत पार पडला. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तेजस्विनीला शुभेच्छा दिल्या आहेत. तेजस्विनी आता एका राजकीय घराण्यात सून म्हणून प्रवेश करणार असल्याने चाहत्यांमध्ये आणि इंडस्ट्रीत याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.बिग बॉस मराठीमुळे (Bigg Boss Marathi) घराघरांत पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीनं ‘चित्तोड की रानी पद्मिनी’ या हिंदी मालिकेतून रुपेरी पडदा गाजवलेला.त्यानंतर मात्र तिनं मराठीत पाऊल टाकलं आणि अनेक भूमिका केल्या. मकरंद अनासपुरेसोबतचा तिचा ‘छापा काटा’ सिनेमाही विशेष गाजलेला. तसेच, ती ‘बिग बॉस मराठी सीझन 4’मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती, जिथे तिचा स्पष्टवक्तेपणा आणि आत्मविश्वास प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.

‘राजमंच’ युट्यूब चॅनलला काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीनं मुलाखत दिलेली. या मुलाखतीत तिला विचारलेलं की, दिसायला सुंदर, घारे डोळे…लोकप्रिय अभिनेत्री म्हटल्यानंतर तुला तर लग्नाच्या अनेक मागण्या येत असतील, तरीही तू अजून लग्न केलं नाही? यावर उत्तर देताना तेजस्विनीनं सांगितलेलं की, ‘याला माझा निषेध आहे… मला आजपर्यंत एकही स्थळ आलं नाहीये. इतकंच काय तर माझ्या वडिलांनाही विचारा…” अभिनेत्री तेजस्विनी लोणारी म्हणालेली की, “आता मला खरंच थोडं वाईटही वाटायला लागलंय. आता अनेक कलाकारांची लग्न झाली, साखरपुडे होतायत… हिचं पण लग्न झालं, अरे तिचं पण झालं… असं वाटतं मला… माझ्या बाबांनी अनुरुपवर रजिस्टर केलेलं. पण काही नाही झालं… 50 जणांनी प्रपोज केलं असेल, पण लग्नासाठी एकही स्थळ आलं नाही…” तसेच, लग्नसंस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. योग्य पार्टनर भेटला की नक्की लग्न करणार, असंही तेजस्विनीनं आणखी एका मुलाखतीत म्हटलं होतं.

“मी पुण्याची आहे. माझं आजोळ येवला आहे. वडील आर्मीमध्ये असल्यामुळे माझं लहानपण सतत स्थलांतरात गेलं. मात्र नंतर आम्ही पुण्यात स्थायिक झालो. दहावीनंतर मी पुण्यात कॉलेज करत होते आणि पुढे करिअरसाठी मुंबईत आले. मला बऱ्याच मुलांनी प्रपोज केलं, किमान 50 मुलांनी तरी. सगळे म्हणायचे की, तू खूप सुंदर दिसतेस, तुझ्या मागे मुलांची रांग लागलेली असेल. पण प्रत्यक्षात मला कोणीच तसं येऊन अप्रोच केलं नाही… कदाचित लोकांना वाटायचं की, मी आधीच रिलेशनशिपमध्ये आहे. अनेकांनी प्रपोज केलं, पण लग्नासाठी कोणीच विचारलं नाही… मी 2006 पासून इंडस्ट्रीत आहे. पण मला इंडस्ट्रीतील कोणीच आवडलं नाही. कॉलेजमध्येसुद्धा मी करिअरकडे लक्ष देणारी मुलगी होते. त्यामुळे तिथेही मी कधी प्रेमात पडले नाही…”, असं तेजस्विनी लोणारी म्हणालेली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ