शफक नाज पुन्हा एकदा प्रेमात!
अभिनेत्री शफक नाज टीव्ही सीरियल ‘महाभारत’ (Mahabharata) मधील ‘कुंती’ आणि ‘राधे कृष्ण’ मधील देवकीच्या भूमिकेसाठी ओळखली जाते.अभिनेत्री शफक नाज (Shafak Naaz) पुन्हा एकदा चर्चेत आली. सध्या शफक नाज ही तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.कारण आहे तिने नुकतीच केलेली आपल्या नात्याची घोषणा. शफकने सोशल मीडियावरून आपल्या नव्या पार्टनरसह काही खास रोमँटिक फोटो शेअर करत आपलं रिलेशनशिप ऑफिशियल केलं आहे.शफाकने कायमच आपल्या वैयक्तिक आयुष्याला खाजगी ठेवण्यास पसंती दिली असली तरी, टीव्ही अभिनेत्रीने काही काळापूर्वी तिचं नातं अधिकृत केलं आहे.
शफकने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून मोनोक्रोम फोटोंचा एक सेट शेअर केला असून त्याला कॅप्शन दिलं आहे ‘घर’. या फोटोंमध्ये तिच्या आणि तिच्या जोडीदारामधील प्रेम स्पष्टपणे झळकतंय. पहिल्या फोटोमध्ये तिचा पार्टनर शफकच्या गालावर किस करताना दिसतो, तर दुसऱ्या फोटोमध्ये दोघे हातात हात घेऊन अगदी गोड पोझ देताना दिसतात. पुढील छायाचित्रांमध्ये दोघे एकमेकांना मिठी मारताना, तर कधी एकमेकांच्या डोळ्यांत पाहत हसताना दिसतात. या फोटोंवर फॅन्सनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांनी शफकला शुभेच्छा देत तिच्या नव्या सुरुवातीसाठी प्रेम व्यक्त केलं आहे.
अभिनेत्री शफक यापूर्वीही नात्यामुळे चर्चेत आली होती. 2023 मध्ये तिने मस्कटमधील बिझनेसमन जीशानसोबत एंगेजमेंट केली होती. मात्र काही महिन्यांनंतर हे लग्न मोडलं. त्यावेळी शफकने एका मुलाखतीत सांगितलं होतं, “प्रत्येक कुटुंबात लग्नाच्या वेळी थोडे मतभेद आणि गैरसमज होतात, विशेषतः लव्ह मॅरेजमध्ये. आमच्यातही काही गैरसमज झाले, पण मी कोणालाही दोष देणार नाही.” सध्या मात्र शफक पुन्हा एकदा प्रेमात बहरली आहे आणि तिच्या या नव्या नात्याची झलक पाहून फॅन्स खुश झाले आहेत.




