spot_img

Crime News : पोटच्या मुलींना वेश्या व्यवसायात ढकलणारा नराधम बाप फरार; नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

spot_img

नवी मुंबई, विजय गायकवाड

आपल्या समाजात बापाला मुलींचा सर्वात मोठा आधार मानले जाते, मात्र नवी मुंबईत एका बापाने आपल्याच दोन अल्पवयीन मुलींचा सौदा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHUT) बेलापूर येथील के-स्टार हॉटेलसमोर सापळा रचून दोन मुलींची सुटका केली, तर या कृत्यात सहभागी असलेल्या एका दलालाला बेड्या ठोकल्या आहेत.

दि. 20 फेब्रुवारी 2026 रोजी AHUT चे वपोनि पृथ्वीराज घोरपडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत अशी माहिती मिळाली की, हरीश नावाचा इसम हा ग्राहकांना वेश्या गमनासाठी अल्पवयीन 16/17 वर्षाच्या मुली पुरवतो एका मुलीचे सुमारे 1 लाख 50 हजार दर फिक्स असून तो ग्राहक शोधत आहे. या दोन्ही लहान मुली वयाने लहान असल्याने त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. त्या मुळे तो ग्राहकांना सोयीनुसार हव्या असलेल्या ठिकाणी पोहचवत असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने AHUT चे वपोनि पृथ्वीराज घोरपडे यांनी बनावट ग्राहकांच्या माध्यमातून दलाल हरीश याच्याशी संपर्क साधला यावेळी त्याने या मुलीचे फोटो दाखवून सौदा 1 लाख 50 हजार रुपयात फिक्स केला. 20 तारखेच्या रात्री अल्पवयीन मुलींना घेऊन येण्यास सांगितले. हरीश हा रात्री 10:45 वाजता सिबिडी बेलापूर येथील के स्टार हॉटेल समोरील चौकात दोन अल्पवयीन मुलींना घेऊन आल्यानंतर AHUT च्या पोलीस पथकाने छापा मारून दोन अल्पवयीन मुलीसह त्याला ताब्यात घेतले.

सदर आरोपी हरीश विकास छारी ( 25) रा. कोपरखैरणे, व्यवसाय मुली पुरवणे पाहिजे असलेला आरोपी राजा सिंग उर्फ राजा भारती हा मुलीचा बाप असून हा फरार झाला आहे. आरोपी विरोधात बेलापूर पोलीस ठाण्यात BNS कलम 143(5),3(5),सह अनैतिक व्यापार प्रति्बंधक कायदा कलम 1956 कलम 4,5 सह पोक्सो कायदा कलम 8,12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहा. पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे AHUT गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि पृथ्वीराज घोरपडे, पोउपनि सरिता गुडे, पो. हवा. म्हात्रे पोलीस अंमलदार अडकमोल, हांडे, मोहिते, ठाकूर, चव्हान, कोलते, पाटील, यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ