spot_img

Actor Kamal Roy Passes Away : 54 व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप; मनोरंजन विश्वात पसरली शोककळा

spot_img

प्रसिद्ध अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेत्याचं वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी अभिनेत्याचा मृत्यू झालाय. त्याच्या निधनाची माहिती समोर येताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचे कुटुंबीय देखील मोठ्या धक्क्यात आहेत. अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी अभिनेत्याला सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. हा अभिनेता इंडस्ट्रीत खलनायक भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध होता. इंडस्ट्रीचा एक तगडा खलनायक म्हणून तो प्रसिद्ध होता. त्याने आतापर्यंत अनेक अजरामवर कलाकृतींमध्ये काम केलं आहे. त्याची मोठी फॅन फॉलोविंग आहे. पण त्याच्या अकाली जाण्याने सगळेच हादरले आहेत.

मलयाळम फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी आणि दिवंगत अभिनेत्री कल्पना यांचा भाऊ अभिनेता कमल रॉय (Kamal Roy) यांचं निधन झालं आहे. 54 व्या वर्षी चेन्नई येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कमल रॉय यांचा मृत्यू हार्ट फेल्युअरमुळे झाला आहे. गेल्या काही काळापासून ते चित्रपटसृष्टीत फारसे सक्रिय नव्हते. त्यांच्या अभिनयाची छाप आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. विशेषतः गंभीर आणि नकारात्मक भूमिका साकारून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यामुळेच मलयालम इंडस्ट्रीत त्यांची ओळख प्रामुख्याने एक ताकदवान खलनायक म्हणून होती.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ