बॉलिवूडचे ही मॅन म्हणून ओळखले जाणारे अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे असून सुरुवातीला रूटीन चेकअपसाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले गेल्याचे सांगितले जात होते. पण उपचारा दरम्यान आता त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगितले जात होते.
धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांची प्रकृती आता स्थिर आहे असे समजले आहे. त्यांचा हार्ट रेट, रक्तदाब आणि इतर पॅरामीटर्स पूर्णपणे सामान्य आले असून त्यांचे लघवीचे प्रमाण देखील चांगले आहे.खबरदारी म्हणून त्यांना काळ निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
धर्मेंद्रयांच्या तब्येतीविषयी कुटुंबाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण त्यांची दोन्ही मुलं सनी आणि बॉबी देओल त्यांच्यासोबत उपस्थित असल्याचं सांगितलं जात आहे. येत्या ८ डिसेंबर रोजी धर्मेंद्र हे ९० वर्षांचे होतील. मात्र या वयातही त्यांनी काम सुरू ठेवलं असून नुकताच त्यांच्या इक्कीस या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. त्यांनी यात अभिनय केला असून हा चित्रपट १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील नायक अरुण खेत्रपाल यांच्यावर आधारित आहे. हा चित्रपट २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे तरी चाहते चित्रपटासाठी उत्सुक आहेत.




