spot_img

Aamir Khan : ‘पीके’साठी आमिर खान रोज खात होता 100 पान! भूमिकेतील परफेक्शनसाठी सहन केला अल्सरचा त्रास!

spot_img

मिस्टर परफेक्शनिस्टची कमिटमेंट पुन्हा सिद्ध पात्राच्या वास्तवतेसाठी आमिरचा वेगळाच प्रयोग, पण आरोग्यावर बसला मोठा परिणाम

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान आपल्या भूमिकांना वास्तव वाटावं म्हणून कोणतीही मेहनत घेण्यास मागेपुढे पाहत नाही. प्रत्येक पात्राला परिपूर्ण न्याय देण्यासाठी तो किती झोकून देतो याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. पण त्याने ‘पीके’ (PK) चित्रपटासाठी केलेलं एक वेगळं प्रयोगात्मक पाऊल ऐकून सगळेच थक्क झाले होते.

राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) दिग्दर्शित पीके’ (2014) या ब्लॉकबस्टर चित्रपटात आमिर खानने एका परग्रही व्यक्तीची (एलिअन) भूमिका साकारली होती. या पात्राला पृथ्वीवरील माणसांच्या भाषा, चालीरीती आणि सवयी शिकायच्या असतात. त्याच्या भूमिकेतील एक खास वैशिष्ट्य म्हणजे तो सतत पान खाताना दिसतो. पात्र अधिक नैसर्गिक दिसावे म्हणून आमिर खानने शूटिंगदरम्यान दररोज तब्बल 100 पान खाल्ले!

आमिरने स्वतः एका मुलाखतीत सांगितलं की, सेटवर खास पानवाला असायचा जो त्याच्यासाठी सतत पान बनवत असे. त्याला आपल्या ओठांचा रंग आणि उच्चार पानाच्या सवयीमुळे नैसर्गिक दिसावेत असं वाटत होतं. त्यामुळे तो दिवसभर पान खात राहायचा.

पण या परफेक्शनचा मोठा मोबदला त्याला चुकवावा लागला. इतक्या प्रमाणात पान खाल्ल्यामुळे आमिरच्या तोंडात गंभीर अल्सर झाले आणि त्याला बोलणं, खाणं अवघड झालं. तरीही शूटिंगदरम्यान त्याने पान खाणं बंद केलं नाही.

चित्रपटातील सहकलाकार अनुष्का शर्मा हिनेही एका मुलाखतीत सांगितलं की, “आमिरला सतत पान खाताना पाहून वाईट वाटायचं, कारण त्याला आवडो किंवा न आवडो, त्याचं पात्र त्याला पान खायला भाग पाडायचं.”

‘पीके’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली. 85 कोटींच्या बजेटवर तयार झालेल्या या चित्रपटाने भारतात 122 कोटींचा व्यवसाय केला, तर जगभरातील कलेक्शन 700 कोटी रुपयांहून अधिक होते.

एकूणच, आमिर खानने पुन्हा एकदा सिद्ध केलं की त्याच्यासाठी “परफेक्शन” ही केवळ सवय नाही, तर ती त्याच्या अभिनयाचा धर्म आहे. मग त्यासाठी दिवसाला 100 पान खावे लागले तरी चालतील!

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ