कॉमेडीयन भारती सिंहच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलणार असून ती दुसऱ्यांदा आई होणार आहे

भारती सिंहनं पती हर्ष लिंबाचियासोबतचा फोटो शेअर करत बेबी बंप फ्लॉन्ट केला आणि गूड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली

भारती सिंगने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करून ही गुड न्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली

फोटो शेअर करत भारतीनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "आम्ही पुन्हा पॅरेंट्स बनणार आहोत... आशीर्वाद, गणपती बप्पा मोरया।"

भारतीच्या सोशल मीडिया पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

भारतीने ही आनंदाची बातमी केवळ इंस्टाग्रामवरच नाही, तर एका व्लॉगद्वारे देखील शेअर केली.

भारती सध्या तिच्या कुटुंबासह स्वित्झर्लंडमध्ये आहे, तिथून या जोडप्याने ही आनंदाची बातमी शेअर केली.

हर्ष आणि भारतीने या आनंदाच्या बातमीला समर्पित एक संपूर्ण व्लॉग तयार केला आहे, ज्याचे शीर्षक आहे "गोला मोठा भाऊ बनणार आहे."