भारताचे माजी कर्णधार मंसूर अली खान पतौडी यांचा आज जन्मदिवस आहे.
त्यांना भारताचा सर्वात महान कर्णधार समजले जात असे.
त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने प्रथमच परदेशात कसोटी मालिका जिंकली होती.
एका अपघातात त्यांच्या एका डोळ्याला इजा झाली होती. पण त्यानंतरही त्यांनी क्रिकेट खेळणे सोडले नाही.
मंसूर अली खान पतौडी यांचा जन्म 5 जानेवारी 1941 रोजी भोपाळ येथे झाला होता.
1961 मध्ये एका कार अपघातात एक काचेचा तुकडा त्यांच्या डोळ्यात गेला होता. यामुळे त्यांचा उजवा डोळा खराब झाला.
अली खान पतौडी भारताचे सर्वात कमी वयाचे कर्णधार होते.
वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी त्यांनी भारतीय संघाची धुरा सांभाळली होती.
हा त्यांच्या नावावर एक रेकॉर्ड होता. पण नंतर झिम्बॉम्बेच्या ततेन्दा तायबूने हा रेकॉर्ड मोडीत काढला.
प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरेनं वयाची चाळीशी गाठली आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया तिच्याबद्दल काही माहिती
Check It Out