पोलिसांकडूनही जोरदार तयारी करण्यात आली असून पोलिसांची करडी नजर असणार असून मोठा पोलिस बंदोबस्त असणार आहे.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज आहे. देशभरात जोरदार तयारीही सुरू आहे. मुंबईही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तयार असून हॉटेल, शॉपिंग मॉल्स येथे खास सजावट करण्यात आली. मुंबई पोलिसांनीही आपली तयारी पूर्ण केली आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी, नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त मुंबईत (Mumbai) धार्मिक कार्यक्रमांसोबतच सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. मुंबई पोलिसांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येसाठी सुरक्षेची विशेष काळजी घेतली. 10 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 38 पोलीस उपायुक्त, 61 सहायक पोलीस आयुक्त, 2, 790पोलीस अधिकारी आणि 14,200 पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. रात्रभर पोलिसांचा चाैख बंदोबस्त असणार आहे. यासोबतच शहराच्या संवेदनशील भागात एसआरपीएफ, क्यूआरटी पथके, बीडीडीएस, आरसीपी आणि होमगार्ड्सनाही तैनात करण्यात आली.
पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील चार उपविभागांतर्गत 16 पोलिस ठाणे व 11 सशस्त्र दूरक्षेत्र परिसरात कायदा सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी याकरिता आवश्यक उपाययोजना करण्याचे व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाया केल्या जातील. कार्यालयीन स्तरावर 65 अधिकारी, 750 पोलिस अंमलदारांचा चोख पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. उपविभाग गोंदिया, तिरोडा, आमगाव, देवरी अंतर्गत प्रत्येकी एक अधिकारी, 10 अंमलदारांचे स्ट्राइकिंग फोर्स, 10 अंमलदारांचे रिझर्व फोर्स, प्रत्येक ठाणे स्तरावर महत्त्वाच्या चौकात तसेच वर्दळीच्या व गर्दीच्या ठिकाणी पॉईंट, गस्त पेट्रोलिंग, बंदोबस्त व नाकाबंदी केली जाणार आहे.




