दिया मिर्झा बॉलिवूडमधील एक असं नाव जे अभिनयाव्यतिरिक्त ही आपल्या सामाजिक कार्यासाठी आणि ज्वलंत विषयावर रोखठोकपणे मत मांडणारी अभिनेत्री म्हणून सातत्यानं चर्चेत असतं.
दियाचा जन्म 9 डिसेंबर 1981 रोजी हैदराबाद येथे झाला होता. याच निमित्ताने आज आपण दिया मिर्झाबद्दल जाणून घेऊयात...
वडील फ्रँक हेंडरिक एक जर्मन इंटेरिअर डिझायनर आहेत. तिची आई दिपा या बंगाली आहेत.
दिया मिर्झा आता अभिनेत्रीबरोबरच एक सामाजिक कार्यकर्ता म्हणजेच सोशल ऍक्टिव्हिस्टही आहे.
रहना है तेरे दिल में या चित्रपटमध्ये दियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले , जो खूप लोकप्रिय झाला.
परिणीता या एका प्रसिद्ध चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका केली होती.
लगे रहो मुन्ना भाई या गांधीगिरीवर आधारित चित्रपटात ती दिसली होती.
दत्तच्या बायोपिकमध्ये तिने मान्यता दत्तची भूमिका साकारली होती.
बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र यांचा वाढदिवस ८ डिसेंबर रोजी असतो यांच निमित्ताने चला टाकूया त्यांच्या काही गाजलेल्या चित्रपटांवर नजर