spot_img

Prajakta Gaikwad Shambhuraj Khutwad Wedding Entry Controversy : नंदीवर बसून एन्ट्री घेतल्यामुळे अभिनेत्री ‘प्राजक्ता गायकवाड’ होतेय ट्रोल

spot_img

प्राजक्ताच्या शाही लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. 

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ (Swarajyarakshak Sambhaji) मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) हिनंही शंभूराज खुटवड (Shambhuraj Khutwad) याच्याशी आपली लग्नगाठ बांधली. प्राजक्ताचं लग्न ठरल्यापासूनच तिच्या आणि शंभूराजच्या लगीनघाईची चर्चा रंगलेली. अगदी डोळे दिपवणाऱ्या, शाही विवाहसोहळ्यात प्राजक्ता गायकवाडनं उद्योगपती शंभूराज खुटवडशी साताजन्माची गाठ बांधली. प्राजक्ताच्या शाही लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. अशातच आता दोघांच्या रिसेप्शनची तुफान चर्चा रंगली आहे.

प्राजक्ताच्या रिसेप्शनच्या लूकपेक्षाही तिची एन्ट्री चर्चेचा विषय ठरतेय. पुण्यात पार पडलेल्या पारंपरिक, शाही विवाहसोहळ्यात प्राजक्ता आणि शंभूराजनं रिसेप्शनसाठी दणक्यात एन्ट्री घेतली. दोघांची एन्ट्री डोळ्यांचं पारणं फेडणारी भव्य अशी होती. एका भव्यदिव्य अशा नंदीवर बसून प्राजक्ता गायकवाडनं दणक्यात एन्ट्री घेतली. उद्योगपती शंभुराज खुटवड आणि प्राजक्ता गायकवाडनं अतिभव्य एन्ट्री घेतली आणि त्यामुळेच आता ती नेटकऱ्यांच्या टीकेची धनी ठरतेय. प्राजक्ता शंभूराजनं अवाढव्य नंदीवर बसून एन्ट्री घेतली. पण, ज्या नंदीवर प्राजक्ता आणि शंभुराज बसलेले, त्या भव्य नंदीच्या पुढे भगवान शंकर चालत होते. ते पाहून चाहत्यांचा काहीसा हिरमोड झाला आणि अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, अनेक चाहत्यांनी भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ