थंड वातावरणामुळे शरीरातील उष्णता टिकवून ठेवणे कठीण होते.  अशा परिस्थितीमध्ये हायपोथर्मिया होऊ शकतो.

ज्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते.

हिवाळा ऋतू हा तसा आल्हाददायक आहे. पण हवामानात बदल झाला की, अनेक आजार डोकं वर काढू लागतात.

अशात आता हृदयविकाराच्या रुग्णांना देखील अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. 

कारण हिवाळ्यात हृदयविकाराच्या घटनांमध्ये सर्वाधिक वाढ होताना दिसत आहे.

आरोग्य तज्ज्ञ सांगतात,  हिवाळ्यातील दिवसात हवामानातील तापमान घटते. 

हिवाळ्यात कमी तापमानामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या आकुंचन पावतात. यामुळे रक्त हळूहळू हृदयापर्यंत पोहोचते.

ज्यावेळी रक्तपुरवठा मंदावतो आणि त्यावेळी रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होतात. अशा स्थितीत रक्तपुरवठा खंडित होऊन हार्ट अटॅक येतो.

यामुळे हिवाळ्यात हृदयविकाराच्या झटक्याचा धोका टाळण्यासाठी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी 

हवामानासाठी अनुकूल असे कपडे परिधान करा. असे केल्याने तुम्हाला उबदार राहण्यास आणि हिवाळ्यात तुमचे हृदय सुरक्षित ठेवण्यास मदत होईल.

रोजच्या शारीरिक हालचालींमुळे प्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच व्यायाम करा.

ताजी फळे, भाज्या, कडधान्ये, शेंगा, संपूर्ण धान्य, बेरी, शेंगा, फ्लॅक्ससीड्स, पालक, गाजर आणि ब्रोकोली खा.

गरम सूप प्या. जंक, मसालेदार, तेलकट आणि हवाबंद डब्यातील अन्नपदार्थ टाळा.

आवळा खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया आवळा खाण्याचे फायदे...