चणे आणि गुळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. चला तर जाणून घेऊया चणे आणि गुळ खाल्ल्याने काय फायदे होतात...
चण्यातील प्रथिने आणि गुळातील पोटॅशियममुळे स्नायू मजबूत होतात, तर चण्यातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियममुळे हाडे बळकट होतात.
अंकुरित चण्यांमध्ये फायबर असते जे पचनसंस्था निरोगी ठेवते आणि बद्धकोष्ठता, ऍसिडिटी आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम देते.