आदित्य रॉय कपूर याचा जन्म १६ नोव्हेंबर १९८५ मध्ये मुंबईत झाला.
आदित्य रॉय कपूरला लहानपणापासून क्रिकेट खेळण्याची आवड होती.
त्याला क्रिकेटर व्हायचे होते. शाळेमध्ये असताना आदित्य रॉय कपूर क्रिकेट खेळण्यामध्ये लक्ष द्यायचा.
मात्र आदित्यची आई शाळेत नाटक दिग्दर्शित करायची यामुळे त्यालाही अभिनयाची आवड निर्माण झाली.
यानंतर आईकडून अभिनयाचे धडे मिळाल्या नंतर आदित्यने चित्रपट सृष्टीत पदार्पण केले
बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:चे नाव कमावले आहे. तो गेली १४ वर्षेचित्रपटसृष्टीत सक्रिय आहे
आदित्य रॉय कपूर पहिल्यांदा २००९ मध्ये 'लंडन ड्रीम्स' चित्रपटात दिसला होता.
यानंतर त्याने 'गुजारिश' आणि 'एक्शन रिप्ले' सारख्या चित्रपटात काम केले, पण त्याला हवीतशी प्रसिद्धी मिळाली नाही.
यानंतर आदित्य रॉय कपूरला एक चित्रपट मिळाला ज्यामुळे तो रातोरात सुपरस्टार झाला. तो चित्रपट म्हणजे 'आशिकी २'.
आज देशभरात होत आहे बालदिन साजरा. बालदिनानिमित्त चला पाहूया सेलिब्रिटींचे काही बालपणीचे फोटो...
Check It Out