जिममध्ये वजन उचलताना दुखापत? मग विम्याचा करता येणार का दावा? जाणून घ्या

Gym Health Insurance : सध्या हँडसम, ब्युटी विथ बोल्ड आणि फिटनेसचा जमाना आहे. प्रत्येकाला आपली फिटनेस दाखवायची आहे. त्यामुळे अनेक जण सकाळ,संध्याकाळ जिममध्ये घाम गाळताना दिसतात. पण जिममध्ये दुखापत झाल्यास विमा असतो का?

धावपळीच्या जगात प्रत्येकाला फिट, तंदुरुस्त राहावे वाटते. प्रत्येकाला डोलेशोले तयार करायचे नाहीत. पण सुटलेले पोट आणि थकलेले चेहरा अनेकांना नको आहे. त्यासाठी अनेक जण सकाळ आणि संध्याकाळी जिममध्ये कसरत करतात. घाम गाळतात. काही जण योगा, मेडिटेशन, डायटिंग, झुंबा क्लास,एरोबिक्स आणि जिमकडे वळतात. लहानथोर सगळेच मैदानावर, जिममध्ये घाम गाळताना दिसतात. महिलांचे सुद्धा जिममध्ये जाण्याचे प्रमाण वाढले आहेत.

आता जिमचा ट्रेंड हा मोठ्या शहरातच नाही तर लहान गावांपर्यंत पोहचला आहे. त्याला फॅड म्हणता येणार नाही कारण अनेकजण अगदी प्रामाणिकपणे जिममध्ये जातात. मेहनत घेतात. व्यायाम करतात. पण व्यायाम करताना जर जखमी झाले तर आपण दवाखान्यात जातो. जर इजा गंभीर असेल तर मग वैद्यकीय तज्ज्ञाची मदत घ्यावी लागते. अशावेळी एखादा विमा मदतीला येऊ शकतो का, त्यातून व्यक्तीचा इलाज, उपचाराचा खर्च करता येतो का? जिमसाठी असा खास विमा असतो का? ॲक्सीडेंटल प्रकरणात, अपघातात उपचार करता येईल अशी विमा पॉलिसी आहे का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. काय आहे त्याचे उत्तर?

जर तुमचा जिममध्ये अपघात झाला. तर तुम्ही अशा पॉलिसीजशी जोडलेल्या नेटवर्क रुग्णालयात दाखल होऊ शकता आणि उपचार करू शकता. तुम्हाला कॅशलेस उपचार मिळू शकतात. यामध्ये हातावर अथवा पायावर डंबल पडून गंभीर जखम झाली असेल, मोठ्या यंत्राचा जबर धक्का लागून इजा झाली असेल. रुग्णालयात भरती व्हावे लागत असेल तर त्याचा खर्च विमा कंपनी करते. काही पॉलिसी या एका दिवसाच्या वा 24 तासासाठी विमा देतात.

अर्थात या विम्याला काही मर्यादा पण आहेत. म्हणजे जिममधील अतिउत्साही प्राण्याने काही अजब धाडस केले, त्यातून तो जखमी झाला, ड्रग्स, दारूच्या अंमलाखाली जिममध्ये व्यायाम केला, तसे आढळले तर विमा नाकारल्या जातो. तर काही आरोग्य विमा कंपन्या व्यावसायिक आणि साहसी खेळांमध्ये ज्या गंभीर जखमा होतात अथवा खेळाडूला गंभीर इजा होते, त्यासाठी कोणतीही मदत करत नाही. भारतातACKO आरोग्य विमा कंपनी आणि बजाज एलियांज या जिम आणि खेळासाठी काही खास विमा पॉलिसी देतात. या योजनेचा संपूर्ण तपशील या कंपन्याच्या कार्यालयातून मिळू शकतो.

मुंबई टीम
मुंबई टीमhttps://mumbaioutlook.com
मुंबई आउटलुक ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मुंबई आउटलुक सोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे
हे सुद्धा वाचा
- जाहिरात -
Google search engine

महाराष्ट्र बातम्या

व्हिडीओ