पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी या पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करा...
पावसाळ्यात पचनक्रिया मंदावते, त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी हलके, ताजे आणि वाफवलेले अन्न खावे. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आले,
हळद, लसूण, आणि सुंठ यांचा वापर आहारात वाढवावा.
बाजरी, नाचणी यांसारखे धान्य, मुगाची खिचडी, आणि गरम सूप्सचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
टोमॅटो, पालक किंवा मिश्र भाज्यांचे गरमागरम सूप पचनासाठी हलके असते आणि शरीराला ऊब देते.
सफरचंद, डाळिंब, आणि जांभूळ यांसारखी हंगामी फळे खावीत. कापून बराच वेळ ठेवलेली फळे खाणे टाळावे.
आल्याचा किंवा हळद-तुळशीचा चहा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि सर्दी-खोकल्यापासून आराम देतो.
मोड आलेली कडधान्ये वाफवून किंवा उकडून खावीत. यामुळे शरीराला भरपूर प्रथिने मिळतात.
नाचणी आणि बाजरी या धान्यांपासून बनवलेले पदार्थ पचनास उत्तम असतात आणि पावसाळ्यात ऊर्जा टिकवून ठेवतात.
अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच ‘ईठा’ या बहुचर्चित सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Check It Out