टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना वयाच्या 42 व्या वर्षी पहिल्यांदाच आई होणार आहे.

आपल्या प्रेग्नन्सी जर्नीमुळे ती सध्या खूप उत्साहित असून चाहत्यांसोबत सतत खास क्षण शेअर करताना दिसत आहे.

अलीकडेच करिश्माच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला.

इतर सेलिब्रिटींसारखी पार्टी किंवा क्लबिंग न करता करिश्मा आणि तिचा पती वरुण बंगेरा यांनी घरीच पारंपरिक कीर्तनाचं आयोजन केलं होतं.

करिश्माने सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे व्हिडीओ शेअर केले आहेत.

या खास कार्यक्रमासाठी करिश्माने हातावर सुंदर मेहंदी काढली होती.

तिने हलक्य गुलाबी रंगाची सिल्क साडी परिधान केली होती.

गळ्यात टेंपल ज्वेलरी आणि हातात सोन्याच्या बांगड्या घालून तिने आपला पारंपरिक लूक पूर्ण केला.

याशिवाय मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थित राहून करिश्माचं डोहाळे जेवण खास बनवलं.

तर करिश्माचा पती वरुण बंगेरा आयव्हरी रंगाच्या कुर्ता आणि धोतीमध्ये दिसला. दोघांनी एकत्र डान्स करत हा आनंदाचा क्षण साजरा केला.

करिश्मा आणि वरुण यांनी 2022 मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर चार वर्षांनी त्यांच्या घरी आता लवकरच बाळाचं आगमन होणार आहे.

राजस्थानचा पारंपरिक घुंघट लूक करून कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये गेलेली अभिनेत्री रुची गुजर व्हायरल होत आहे.