नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूडमधील एक अत्यंत लोकप्रिय आणि कसलेला भारतीय अभिनेता आहे

आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्याला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील 'बुढाना' गावात जन्मलेल्या नवाजुद्दीनने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून संघर्ष करत बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले

नवाजुद्दीन सिद्दीकी एका सामान्य भारतीयाप्रमाणे दिसतो. परंतू त्याचा अभिनय उत्तम आहे

नवाजुद्दीन सिद्दीकी एका सामान्य भारतीयाप्रमाणे दिसतो. परंतू त्याचा अभिनय उत्तम आहे

 जवळपास 15 वर्षांच्या संघर्षानंतर तो बॉलिवूडमध्ये आपली ओळख बनवू शकला आहे

'गँग्ज ऑफ वासेपुर' मधून मिळाली ओळख नवाजने 1999 मध्ये आलेल्या 'सरफरोश' मधून करिअरची सुरुवात केली

 2012 पर्यंत नवाजने अनेक लहान-मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले. परंतू त्याला विशेष ओळख मिळाली नाही

 यानंतर अनुराग कश्यप त्याला फैजलच्या भूमिकेतून 'गँग्ज ऑफ वासेपुर' मध्ये घेऊन आला आणि फैजलच्या भूमिकेने नवाजला घराघरात ओळख मिळाली

त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठीचा 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' मिळाला आहे

याशिवाय, त्याला दोन 'फिल्मफेअर पुरस्कार' आणि इतर अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे 

 १९७४ च्या १८ मे रोजी घडलेली महत्त्वाची घटना भारताच्या इतिहासात नोंद झाली.