१९७४ च्या १८ मे रोजी घडलेली महत्त्वाची घटना भारताच्या इतिहासात नोंद झाली.
या घटनेमुळे भारत अण्वस्त्रधारी देशांच्या यादीत समाविष्ट झाला.
भारताने आजच्या दिवशीच पोखरणमध्ये भूमिगत अण्वस्त्र चाचणी केली होती. या चाचणीला स्माइलिंग बुद्धा असं नाव देण्यात आले होते.
१८ मे १९७४ रोजी, भारतीय लष्कराने राजस्थानमधील पोखरण चाचणी क्षेत्रात १०७ मीटर खोल भूमिगत विहिरीत अणुस्फोटाची चाचणी केली.
योगायोगाने १९७४ मध्ये, १८ मे रोजी बुद्ध जयंती देखील होती, जो गौतम बुद्धांच्या जन्माचा सण आहे.
यशस्वी चाचणीनंतर, भाभा अणुसंशोधन केंद्राचे तत्कालीन संचालक राजा रामण्णा यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना एक गुप्त संदेश दिला आणि म्हटले, “अखेरीस बुद्ध हसले आहेत.”
भारताच्या जमिनीवर घडलेल्या या स्फोटामुळे अमेरिका हादरली होती. भारताने अण्वस्त्र चाचणी यशस्वी करून नवा इतिहास रचला होता.
या परीक्षणानंतर भारताला अण्वस्त्र शक्ती म्हणून मान्यता मिळाली.