स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ रोजी एका राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात झाला.

स्मिता पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त त्या्ंच्याबदद्ल काही गोष्टी जाणून घेऊ

 आपल्या नैसर्गिक अभिनयाने चित्रपट रसिकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील यांना ओळखले जाते.

८० दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून त्यांनी बॉलिवूड गाजवलं.

त्यांनी पुण्यातील रेणुका स्वरुप मेमोरियल माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले. त्यांचे वडिल शिवाजीराव गिरधर पाटील हे राजकारणी होते. त्यांच्या आई विद्याताई पाटील या समाजसेविका होत्या.

अभिनय जगात नाव कमावण्यापूर्वी स्मिता पाटील पत्रकार होत्या. न्यूज अँकर म्हणून त्या काम करत होत्या.

रस्त्यावर सापडलेल्या त्यांच्या एका फोटोने तिचे नशीब बदलले. 

एका टेलिव्हिजन दिग्दर्शकाला त्यांचा फोटो आवडला. यामुळे त्या टीव्हीवर काम करू लागल्या आणि नंतर मोठ्या पडद्यावर त्यांनी लाखो लोकांना मोहित केले.

स्मिता पाटील यांनी वयाच्या ३१ व्या वर्षीच जगाचा निरोप घेतला. १३ डिसेंबर १९८६ रोजी त्यांचं निधन झालं.

विशेष म्हणजे त्यांच्या निधनानंतर त्यांचे जवळपास चौदा चित्रपट प्रदर्शित झाले होते.

वयाच्या २० व्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणाऱ्या स्मिता या जवळजवळ ७५ चित्रपटांच्या अनभिषिक्त महाराणी ठरल्या होत्या. १९८४ मध्ये त्या आंतरराष्ट्रीय नायिका बनल्या.

स्मिता पाटील यांचा ‘जैत रे जैत’ हा चित्रपट प्रचंड गाजला. यातील त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना घराघरात ओळख मिळाली.

बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षितचा नवा लुक तुम्ही पाहिला आहात का ?