मंकी पॉक्स सदृश्य आजाराचा पहिला संशयित रुग्ण भारतात सापडला आहे.

या आजाराचा विषाणू माकडापासून माणसात आल्याचे म्हटले जात आहे.

चला तर जाणून घेऊया काय आहे मंकी पॉक्स आणि त्याची लक्षणे ?

कोरोनाच्या मगरमिठीतून जग आता कुठे मोकळा श्वास घेत असतानाच मंकीपॉक्स नावाच्या विचित्र आजाराने डोके वर काढले आहे.

 या आजारावर अद्याप लस निर्माण झालेली नाही, तसेच हा आजार लवकर पसरत असल्याने काळजी घ्यावी असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

सध्या या विचित्र आजाराने त्रस्त असलले रुग्ण युरोप, कॅनडा, ऑस्ट्रेलिया इत्यादी ठिकाणी सापडले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने यासंदर्भात चर्चा करण्यासाठी तातडीची बैठक बोलावली.

ताप येऊन अंगभर पुरळ उठून कालांतराने त्याचे फोडांत रुपांतर होते. 

अंगदुखी, डोकेदुखी, पाठदुखी, अशक्तपणा हेही लक्षणे आहेत. वेळीच उपचार न केल्यास गुंतागुंत वाढत जाते.

मंकीपॉक्सचे रुग्ण अमेरिका, ब्रिटन, इटली, स्पेन, इत्यादी देशांत आढळले आहेत. आतापर्यंत १०० हून अधिक रुग्ण या देशांमध्ये सापडले आहेत. 

मंकीपॉक्सचा विषाणू डबल स्टँडर्ड आहे. संशोधकांच्या मते हा आजार उंदीर, खार, उंदराचे मांस इत्यादींपासून पसरतो.

मंकीपॉक्स हा आजार साथरोग प्रकारातील असल्याने झपाट्याने फैलावतो.

मंकीपॉक्सचे विषाणू हवेतूनही पसरत असल्याने मास्कही लावावा, असा संशोधकांचा सल्ला आहे.

अभिनेत्री तारा सुतारिया आणि वीर पहारिया यांची जोडी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.