दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू ही तिच्या अभिनयासोबतच स्टाइल आणि व्यक्तिमत्त्वामुळे नेहमीच चर्चेत असते.

तिच्या आयुष्यातील वैयक्तिक आणि व्यावसायिक बदलांमुळे ती नेहमीच लोकांच्या लक्षात राहिली आहे.

लग्नानंतर तिच्यात झालेला बदल आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याचा तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

विशेषतः अलीकडेच तिच्या धुळकट गुलाबी रंगाच्या साडीतील फोटोने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

हातात गुलाबी कमळ घेतलेल्या तिच्या #TheBapuBommaSeries मधील फोटोंनी सोशल मीडियावर क्षणात लोकांची मने जिंकली आहेत.

ही साडी सामान्य नसून, पिढ्यानपिढ्या चालत आलेली कारागिरी जपणारी, हाताने विणलेली व्यंकटगिरी साडी आहे.

Samantha Ruth Prabhu गुलाबी साडीतील हा लुक तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा नवीन लुक तुम्ही पाहिला आहे का?