मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.
लापता लेडीज या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांनी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला आहे.
सिनेमातल्या भूमिकेची लांबी लहान असली तरी छाया कदम हिनं सादरीकरणानं आजवर प्रत्येक सिनेमात स्वतःची छाप सोडली आहे.
‘झुंड’ असो किंवा अलीकडे प्रदर्शित झालेला ‘लापता लेडीज’ किंवा 'मडगाव एक्सप्रेस'मधील विनादी भूमिका; तिच्या प्रत्येक भूमिकेचं कौतुक झालं आहे.
पण तुम्हाला माहिती आहे की, छाया कदमचा इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता.
मुंबईतल्या कलिनामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या छायाचे वडील गिरणी कामगार होते.
बारावीत एकदा नापास झाल्यावरही न खचता तिनं टेक्सटाइल डिझाइनची पदवी मिळविली आणि राज्यस्तरावर कबड्डीही खेळली.
शाळा-महाविद्यालयात नाटकांमध्ये भूमिका करणाऱ्या छायानं पुढं तीच वाट निवडली.
वामन केंद्रे यांच्या ‘झुलवा’ नाटकासह ‘फाट्याचं पाणी’, ‘विठ्ठल’ आणि ‘दगडांचा देव’ अशा लघुपटांमध्येही भूमिका साकारल्या. पुढं चित्रपटात संधी मिळाली, मात्र, ‘बाईमाणूस’ हा पहिला चित्रपट पडद्यापर्यंत आला नाही.
हिंदीतही ‘सिंघम रिटर्न्स’, ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘अंधाधुन’, ‘मडगाव एक्सप्रेस’ या चित्रपटांमधून तिनं चमक दाखवली आहे.
‘न्यूड’ चित्रपटासाठी तिला राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
त्याबरोबरच वेगवेगळ्या पुरस्कारांसाठी चार नामांकनं मिळवून तिनं कलाविश्वात आपले वेगळं स्थान निर्माण केलं.
मराठी कलाकारांची ताकदवान अभिनयाची परंपरा तिने पुढे सुरू ठेवला आहे.
घटस्फोटानंतर पुन्हा हार्दिक पांड्या पुन्हा पडला आहे प्रेमात, तर चला जाणून घेऊया कोण आहे क्रिकेटरची गर्लफ्रेंड...