वाढते तापमान, उष्णतेची लाट, अपुरे पाणी पिणे आणि उलट्या-जुलाबासारख्या आजारांमुळे निर्जलीकरणाची प्रकरणे वेगाने वाढत आहेत.

अति घाम येणे, चुकीची जीवनशैली, शारीरिक हालचाली आणि वृद्ध किंवा लहान मुलांमधील पाण्याची कमतरता ही मुख्य कारणे आहेत

यामुळे शरीरातील आवश्यक द्रव आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात

निर्जलीकरणाची प्रकरणे वाढण्याची मुख्य कारणे पुढीलप्रमाणे आहेत:

वाढत्या तापमानामुळे आणि कडक उन्हामुळे विशेषतः उन्हाळ्यात शरीरातून घामावाटे जास्त पाणी बाहेर पडते

 कामाच्या व्यापात किंवा विसरभोळेपणामुळे पुरेसे पाणी न प्यायल्याने शरीरात पाणी कमी पडते 

उष्ण हवामानात व्यायाम किंवा कष्टाची कामे केल्यामुळे जास्त घाम येतो, ज्यामुळे निर्जलीकरण होऊ शकते 

वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची भावना कमी होते, तर लहान मुलांमध्ये पाण्याच्या कमतरतेची लक्षणे लवकर ओळखली जात नाहीत, त्यामुळे या गटात धोका जास्त असतो 

अनियंत्रित मधुमेहामुळे वारंवार लघवी होऊन शरीरातील पाणी कमी होते

‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूचा नवा लुक तुम्ही पहिला आहे का?