उन्हाळ्यात गॅसचा वापर न करता, न शिजवता बनवता येणाऱ्या थंड आणि पौष्टिक पदार्थांमध्ये अनेक पदार्थांचा समावेश होतो.
हे पदार्थ शरीराला थंडावा देतात आणि पचनास हलके असतात.
कैरीचे पन्हे, आंबट-गोड लिंबू सरबत, कोकम सरबत, मठ्ठा, गुलकंद दूध, नारळ पाणी, लस्सी यांचे सेवन करावे
कोशिंबीर आणि सॅलड-काकडीची कोशिंबीर, टोमॅटो-कांदा सॅलड, दही-बुंदी रायता, फळांचे सॅलड, मोड आलेल्या कडधान्यांची कोशिंबीर खावी
झटपट नाश्ता- दही-पोहे, भिजवलेले पोहे, फळे (कलिंगड, खरबूज, द्राक्षे), आंबा रस, फळांचा सलाड.
कैरीची किंवा ओल्या खोबऱ्याची चटणी, कोथिंबीर-पुदिना चटणी करावी