तुम्हीही होळी खेळण्यासाठी उत्सुक असाल तर रंग काढण्याच्या उपायांपेक्षा, त्वचेला जास्त रंग लागू नये याची काळजी घेणे केव्हाही उत्तम असते.होळी खेळण्यापूर्वी घ्यायची काळजी

त्वचेचे संरक्षण करण्यासाठी होळी खेळण्यापूर्वी अंगाला खोबरेल किंवा मोहरीचे तेल लावावे.

डोळ्यांच्या सुरक्षेसाठी कॉन्टॅक्ट लेन्स टाळून चष्मा वापरावा. 

तसेच, पूर्ण बाह्यांचे कपडे घातल्यास रंगाचा थेट संपर्क टाळता येतो.

रंग काढताना त्वचा जोरात न घासता बेसन, दही किंवा तेलाचा वापर करावा. त्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही.

कारण सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात भेसळ युक्त रंग विकण्यास आले आहेत. त्यात केमिकलचा वापर ही भरमसाट करण्यात आला आहे. त्यामुळे ही काळजी घेणे गरजेचे आहे. 

आरोग्यदायी होळीसाठी काही नियम नक्कीच आहे. ते प्रत्येकाने फॉलो करणे गरजेचे आहेत.

पॅकेटवरील घटक तपासूनच खरेदी करा. नैसर्गिक रंग वापरून आपली आणि आपल्या प्रियजनांची होळी सुरक्षित आणि आनंददायी करा.

होळीला बाजारात नकली रंगाची भरभराट ओटी अश्या वेळेस करा खऱ्या- खोट्या रंगाची ओळख कशी करावी?