17.8 C
New York

India Pakistan War : भारत अन् पाकची लष्करी ताकद किती?

Published:

आम्ही शांततेसाठी प्रयत्न केले, पण प्रत्येकवेळी विश्वासघाताचा सामना करावा लागला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गेल्या महिन्यात पाकिस्तानबाबत एका पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर महिन्याभरानंतर जम्मू-काश्मीरमधील पहलगावमध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यात 27 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला. गेल्या सहा वर्षांतील हा सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला होता. हा हल्ला पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटनेकडून झाल्याचे समोर आल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्याचा निर्णय घेतला. भारताने पाच मोठे निर्णय घेतले. ज्यात सिंधू पाणी वाटप करार स्थगित करणे, अटारी सीमा बंद करण्यासह पाक नागरिकांनी भारत सोडणे, पाकचा व्हिसा रद्द करणे असे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पण, पाकिस्तानवर अशी कारवाई करण्याऐवजी त्यांच्याशी युद्ध (India Pakistan War) करून त्यांना कायमचा धडा शिकविला पाहिजे, अशी मागणी भारतीयांची आहे. अशात जर, भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाल्यास कोण वरचढ ठरू शकतो आणि आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये कितीदा युद्ध झाले, त्याचे परिणाम काय झाले? दोन्ही देशांची संरक्षण क्षमता किती आहे हे आपण पाहूया…

India Pakistan War इंग्रजांनी देश सोडला पण फाळणी करून

1947 मध्ये इंग्रजांनी भारत सोडला. परंतु देशाची फाळणी करून. भारत आणि पाकिस्तान दोन राष्ट्र तयार झाले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये नंदनवन असलेल्या काश्मीरवरून संघर्ष पेटला. जम्मू-काश्मीर संस्थाने राजा हरि सिंह यांनी आक्रमणानंतर भारताकडे मदतीसाठी आवाहन केले. मदत हवी असेल तर, भारतात संस्थान विलीन करावी लागेल, अशी अट राजा हरी सिंह यांच्यासमोर ठेवण्यात आली. पंतप्रधान नेहरू आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दबावामुळे जम्मू-काश्मीर भारतात विलीन झाले. परंतु संयुक्त राष्ट्राच्या हस्तक्षेपामुळे युद्ध थांबले. पण काश्मीरचा काही भाग पाकिस्तानच्या ताब्यात गेला. 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तामध्ये दुसरे युद्ध झाले. त्यावेळी पाकिस्तानने ऑपरेशन जिब्राल्टर राबवत जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसखोरी केली. त्यावर भारताने पश्चिम पाकिस्तानवर पूर्ण प्रमाणात लष्करी हल्ला करून प्रत्युत्तर दिले.

India Pakistan War 1971 मध्ये भारत व पाकिस्तानमध्ये तिसरे युद्ध

1971 मध्ये भारत व पाकिस्तानमध्ये तिसरे युद्ध झाले. या युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर पूर्व पाकिस्तानचे तुकडे होऊन बांग्लादेशाची निर्मिती झाली. कारगील युद्धवेळी अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते. दोन्ही देशात समझौता सुरू होता. १९९९ ला वाजपेयी हे लाहोरला गेले होते. पण पाकने पाठित खंजीर खुपसले. दुसरीकडे पाकिस्तानने सीमा ओलांडून कारगिलमधील डोंगर भागावर कब्जा केला. पाकिस्तानचे सैन्य हटविण्यासाठी भारतालाही युद्ध करावे लागले. भारतीय सैन्याच्या (Indian Army) शूर सैनिकांनी टायगर हिल, पॉइंट ४८७५, पॉइंट ५१४० यासह सर्व पर्वतीय शिखरे पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यातून मुक्त करून 26 जुलैला कारगिल युद्ध जिंकले. त्यानंतर भारताविरुद्ध पाकपृरस्कृत दहशतवादी हल्ले सुरूच राहिले.

India Pakistan War उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक

2008 मधील मुंबई हल्ला, त्यानंतर उरी भागात लष्कराच्या कॅम्पवर झालेल्या हल्ल्यात 16 जवान शहीद झाले होते. प्रत्युत्तरात भारतीय जवानांनी पाकच्या हद्दीत दोन किलोमीटर आत घुसून हवाई हल्ले करत दहशतवाद्यांचे पाच तळे उद्धवस्त केले . त्यानंतर पुलवामा हल्ला झाला. त्यात चाळीस जवान शहीद झाले होते. त्यानंतर आता पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला झाला. त्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी कायदेशीर मार्ग भारताने अवलंबला आहे.

India Pakistan War भारत आणि पाकिस्तान युद्ध झाले तरी कुणाची किती ताकद

भारताचे क्षेत्रफळ 32 लाख 87 हजार चौरस किलोमीटर इतके आहे. तर, पाकिस्तानचे क्षेत्रफळ 7 लाख 96 हजार चौरस किलोमीटर आहे. भारताची लोकसंख्या 140 कोटी, तर पाकिस्तानच्या लोकसंख्या 25 कोटी इतकी आहे. भारताचे दरडोई उत्पन्न 2 हजार 150 डॉलर इतके आहे. तर पाकिस्तानचे दरडोई उत्पन्न 1340 डॉलर इतके आहे. भारताचे संरक्षण बजेट 6 लाख 81 हजार कोटी इतके आहे. तर पाकिस्तानचे संरक्षण बजेट हे एक लाख 80 हजार कोटी इतके आहे. सैन्याचा विचार केल्यास भारताकडे निमलष्करी दल धरून तब्बल 25 लाख सैनिक आहेत. तर पाकिस्तानकडे सात लाखांच्या आसपास सैन्य आहे. सैन्याच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमाकांवर आहे. भारताकडे 4614 रणगाडे तर पाकिस्तानकडे 3742 रणगाडे आहेत. भारताकडे अर्जुन मुख्य युद्ध टँक टी-९०, भीम टँक, पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर्स, ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे, हॉवित्झर आणि इतर आधुनिक तोफखाना आहे.

India Pakistan War भारताची हवाई दलाची ताकद

भारताचं हवाई दल जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांपैकी एक आहे. भारताकडे 2229 विमाने आहेत. ज्यात 600 लढाऊ विमाने, 899 लष्करी हेलिकॉप्टर आहेत. याशिवाय भारताकडे राफेल, मिरज, सुखोई अशी शत्रूंना घाम फोडणारी लढाऊ विमानंदेखील आहेत. तसेच ब्रह्मोस, रद्रम, अस्त्र, निर्भय, आकाश अशी हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र आहेत. याउलट पाकिस्तानकडे 1434 विमाने आहेत. त्यात 378 लढाऊतर 549 प्रशिक्षण विमाने असून, 352 हेलिकॉप्टर आहेत.

India Pakistan War नौदलाची शक्ती

भारताकडे एक लाख 42 हजार नौदल मनुष्यबळ आहे. 150 युद्धनौका, 18 पाणबुड्या आणि दोन विमानवाहू जहाजे आहेत. ज्यात
आयएनएस विक्रांत सारखं मोठं विमानवाहू जहाज आहे. त्यातून लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर लाँच करणं शक्य आहे. तर पाकिस्तानकडे 114 नौदल जहाजे आहेत. आठ युद्धनौका आहेत. पाकिस्तानला चीन आणि अमेरिकेकडून लष्करी साहित्य मिळालेले आहेत. तसं पाहिले दोन्ही देशांकडे अणुबॉम्ब आहेत. लष्करी सामर्थ्यामध्ये भारत सहज पाकिस्तानला नमू शकतो. युद्ध झाले तर भारत पाकिस्तानला दोन दिवसांत संपवेल, अशी भारताची ताकद आहे.

India Pakistan War गृहयुद्धात पाकला धडा शिकवा

भारताने पाकविरुद्ध लष्करी कारवाई केली पाहिजे, असे स्पष्ट निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे आहे. ते म्हणाले जगाचा विचार न करता भारताने आपल्या देशाचे हित लक्षात घेऊन पाकिस्तान विरोधात लष्करी कारवाई करणे गरजेचे आहे. पाकिस्तानची पारंपारिक सैन्य तैनाती ही भारतीय सीमेवर असायची. परंतु बलुचिस्तान व खैबर पख़्तूनख़्वा या भागात ग्रहयुद्धाची परिस्थिती आहे. पाकिस्तानची सैन्य मोठ्या प्रमाणात तिकडे गुंतलेले आहेत अशा स्थितीमध्ये पाकिस्तानला अद्दल घडवण्याची योग्य वेळ असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img