अंगावर आले तर शिंगावर घेणारच असा स्पष्ट इशारा भारताने बालाकोट सर्जिकल स्ट्राईकमधून दिला होता. (Pahalgam Terror Attack) पण त्यातून पाकिस्तानने धडा घेतला नाही. 22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यात 26 निरपराध नागरिकांचा जीव गेला. पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी पहेलगाममध्ये क्रुरतेचा कळस गाठला. आता त्यांना धडा शिकवण्याचा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. त्याची पहिली चुणूक पण दिसली. या हल्ल्यात सहभागी स्थानिक दोन दहशतवाद्यांना पहिला दणका बसला.
Pahalgam Terror Attack दहशतवाद्याचे घर बॉम्बने उडवले
स्थानिक दहशतवादी आदिल हुसैन थोकर पहलगाम हल्ल्यात सहभागी याचे घर सुरक्षा दलांनी बॉम्बने उडवले. गोरी परिसरात अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा येथील त्याचे घर होते. आदिल थोकर उर्फ आदिल गुरी या नावाने ओळखल्या जातो. पहेलगामच्या बैरसन दरी परिसरात पर्यटकांवर हल्ल्ला करण्याची योजना आखणे आणि हल्ला करणे, पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करण्यात तो आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. तर या हल्ल्यातील सहभागी दुसरा दहशतवादी आसिफ शेख याचे त्राल येथील घर प्रशासनाने जम्मू-काश्मीर बुलडोजर चालवून तोडले.
Pahalgam Terror Attack लष्कर -ए-तैयबाचा हात उघड
लष्कराच्या सूत्रांनुसार, स्टील टीप असलेल्या गोळ्या, एक-47 रायफल्स आणि बॉडी कॅमेरा लावलेल्या चार दहशतवाद्यांनी पहेलगाम येथे हल्ला केला होता. 6 जणांनी हा हल्ला घडवल्याचे समोर येत आहे. त्यात पाकिस्तानचे चार तर स्थानिक दोन दहशतवाद्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली. लष्कर-ए-तैयबाच्या एका समूहाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांनी पहेलगाममध्ये धर्म विचारून हिंदू पर्यटकांवर गोळीबार केला. त्यात 26 जणांना प्राण गमवावे लागले. तर ज्या स्थानिक मुसलमानांनी दहशतवाद्यांना अडवले त्यांच्यावरही गोळीबार केला. या दहशतवाद्यांमध्ये आदिल हुसैन थोकर आणि त्राल येथील रहिवाशी आसिफ शेख यांचा समावेश होता.
Pahalgam Terror Attack दोघांचे पाकिस्तान कनेक्शन उघड
लष्कराच्या सूत्रानुसार, आदिलने 2018 मध्ये अटारी-वाघा बॉर्डरमधून पाकिस्तानमध्ये प्रवेश केला होता. पाकिस्तान प्रवासात त्याने दहशतवादी कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेतले होते. तो गेल्या वर्षीच जम्मू-काश्मीरमध्ये परत आला होता. पहेलगाम हल्ल्यावेळी हे दहशतवादी पश्तूनी भाषेत संवाद साधत असल्याचे समोर आले होते. सुरुवातीला हे सर्व दहशतवादी पाकिस्तानचे असल्याचे समोर आले होते. पण नंतर त्यांना स्थानिक दोघांनी मदत केल्याचे उघड झाले. लष्कर-ए-तैयब्बाच्या द रेजिस्टेंस फ्रंट(TRF) या गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
Pahalgam Terror Attack पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान हल्ल्याची योजना
आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. त्यानुसार, या दहशतवाद्यांनी अनेक दिवसांपूर्वीच नियंत्रण रेषा ओलांडली होती. 19 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कटारा दौऱ्या दरम्यान हल्ल्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण तगडा सुरक्षा व्यवस्था पाहून त्यांनी तो रद्द केला. दहशतवादी हे गुप्तहेर खात्याच्या अधिकाऱ्यांवर गोळीबार करण्याच्या तयारीत होते.