15.8 C
New York

Jammu Kashmir Terror Attack : कोण आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड?

Published:

सगळ्या देशाला जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील बैसारन (Jammu Kashmir Terror Attack) घाटीत झालेल्या दहशतवादी हल्ल्याने हलवून सोडलय. आतापर्यंत 26 पर्यटकांचा मृत्यू या हल्ल्यात झाला आहे. अनेक पर्यटक गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. टीआरएफ म्हणजे ‘द रेजिस्टेंस फ्रंटने’ या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. पाकिस्तान स्थित लश्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा टीआरएफ हा चेहरा आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील लष्कर आणि टीआरएफच्या दहशतवादी कारवायांमागे दहशतवादी सैफुल्लाह खालिदच डोकं आहे. तो या हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे.

डेप्युटी चीफ सैफुल्लाह खालिद सैफुल्लाह कसुरीच्या नावाने लश्कर-ए-तैयबाचा सुद्धा ओळखला जातो. सर्वात मोठा भारताचा शत्रू हाफीज सईदचा तो निकटवर्तीय आहे. या हाफीज सईदने भारतात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत. सैफुल्लाह खालिद आलिशायन गाड्यांचा शौक आहे. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेले दहशतवादी त्याच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. पाकिस्तानी सैन्यातही त्याचं वजन आहे.पाकिस्तानी सैनिकांना हा नेहमी भडकवण्याच काम करत असतो.

मिळालेल्या माहितीनुसार, सैफुल्ला खालिदचा पाकिस्तानात मोठा प्रभाव आहे आणि पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांकडून त्याला रसद पुरवली जाते. खालिदने अनेकदा पाकिस्तानी लष्कराच्या सैनिकांनासमोरही चिथावणी भाषणे करत असल्याची महिती आहे. तसेच, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या सुमारे दोन महिने आधी, सैफुल्ला खालिद पाकिस्तानातील पंजाबमधील कंगनपूरला पोहोचला होता. पाकिस्तानी सैन्याची एक मोठी बटालियन येथे राहते.

Jammu Kashmir Terror Attack गृहमंत्री अमित शाहांनी घेतला सुरक्षा परिस्थितीचा आढावा

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी संध्याकाळी सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पहलगाममध्ये दाखल झाले. गृहमंत्र्यांना जम्मू आणि काश्मीरचे पोलिस महासंचालक नलिन प्रभात यांनी घटनाक्रमाची माहिती दिली. त्यानंतर, शाह यांनी लष्कर, सीआरपीएफ आणि पोलिसांसह सुरक्षा अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img